लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिवाजीमहाराजांचे चरित्र महाराष्ट्राच्या घराघरात नेणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे दीनानाथ रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले गेल्या 60 वर्षा पासून शिवाजी महाराज यांचा इतिहास त्यांनी राज्यात नव्हे तर सातासमुद्रापार नेले आहे
शिवाजी महाराज यांचे व्याख्यानांच्या आणि अन्य कामांच्या निमित्ताने देशा-परदेशात अखंड भ्रमंती सुरू असलेल्या बाबासाहेबांनी नुकतेच शंभराव्या वर्षांत पदार्पण केले होते.
त्यानिमित्ताने त्यांच्या झालेल्या अनेक मुलाखतींमधून त्यांनी उत्साहाने दीड-दीड तास आपले मनोगत व्यक्त केले होते. २६ ऑक्टोबरला सकाळी ते उठले असता त्यांचा तोल गेला आणि त्यांच्या डोक्याला इजा झाली. त्यानंतर त्यांना तातडीने एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
तेथेही पहिले दोन दिवस ते व्यवस्थित बोलत होते. त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना न्यूमोनिया झाला आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. नंतर त्यांची प्रकृती खालावत गेली.