• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

१२ वर्षीय शाळकरी मुलगी गर्भवती ; अन लागला शोध असा !

editor desk by editor desk
August 7, 2023
in क्राईम, राज्य
0
१२ वर्षीय शाळकरी मुलगी गर्भवती ; अन लागला शोध असा !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत असतांना अजून एक घटना समोर आली आहे. एका १२ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तिच्याच एका १६ वर्षीय मित्रावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती डायघर पोलिसांनी रविवारी दिली. पीडित मुलगी अडीच महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यातील अल्पवयीन आरोपीला भिवंडीच्या बाल न्यायालयात पाठविण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

डायघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी डायघर भागातील एका शाळेत शिक्षण घेत आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला अल्पवयीन मुलगाही याच भागातील एका शाळेत जातो. या दोघांची एकमेकांशी गेल्या दोन वर्षांपासून चांगली मैत्री आहे. याच मैत्रीतून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. शाळेत जाण्याच्या बहाण्याने ते एकमेकांना भेटत असत. त्यांच्या या प्रकाराबद्दल दोघांचेही कुटुंबीय अनभिज्ञ होते. दोघांच्याही भेटीदरम्यान चार ते पाच महिन्यांपूर्वी या मुलाने तिच्याशी जवळीक साधत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मात्र, याची तिने कुटुंबीयांना कोणतीही माहिती दिली नाही.

तिच्या पोटात गेल्या काही दिवसांपासून दुखत होते, तसेच मासिक पाळीचाही त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यावेळी ती अडीच महिन्यांची गरोदर असल्याचा प्रकार उघड झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी तिच्याकडे चौकशी केल्यानंतर या प्रकाराची माहिती तिने कुटुंबीयांना दिली. हा प्रकार समजल्यानंतर कुटुंबाला धक्काच बसला. या मुलीच्या तक्रारीवरून याप्रकरणी ४ ऑगस्ट रोजी रात्री बलात्कारासह पोक्सोअंतर्गत डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या मुलाला बाल न्यायालयात पाठविले जाणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गावडे यांनी सांगितले.

Tags: CrimeMumbai
Previous Post

डॉक्टरांनी केले मृत घोषित अन ते झाले जिवंत !

Next Post

अल्पवयीन मुलीच्या मारेकर्‍याला फाशी द्या : बाभुळगाव निघाला कॅण्डल मोर्चा !

Next Post
अल्पवयीन मुलीच्या मारेकर्‍याला फाशी द्या : बाभुळगाव निघाला कॅण्डल मोर्चा !

अल्पवयीन मुलीच्या मारेकर्‍याला फाशी द्या : बाभुळगाव निघाला कॅण्डल मोर्चा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group