नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कधी कधी असं होतं की एखाद्या व्यक्ती रुग्णालयात उपचाराला प्रतिसाद न देत असल्याने दिल्याने किंवा प्रकृती खालवल्याने डॉक्टर त्याला मृत घोषित करतात. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर रुग्ण हालचाल करताना आढळला आहे. असाचा एक प्रकार सध्या समोर आला आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी जिल्हाध्यक्ष महेश बघेल यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले मात्र काही वेळाने ते अचानक जिवंत झाले.
भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष महेश बघेल यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना घरी आणले, मात्र काही वेळाने ते शुद्धीवर आले. त्यांना जीवंत बघून त्यांच्या शोकाकूल वातावरण आंनदात बदललं. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश बघेल यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर नातेवाइकांनी त्यांना घरी आणण्यात आले. घरी सर्व शोकाकूल वातवरण होत. नातेवाईकांना त्यांच्या निधनाची वार्ताही देण्यात आली. मात्र अर्ध्या तासानंतर त्यांच्या शरीरात हालचाल जाणवू लागल्याने त्यांनी त्यांना पुन्हा रुग्णालयात नेले.
बघेल यांचे डोळे उघडले असता त्यांच्या अंगात हालचाल होताना नातेवाईकांनी पाहिलं आणि त्यांना ते जीवंत असल्याचं जाणवलं. कुटुंबियांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना न्यू आग्रा येथील रुग्णालयात नेले जेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बघेल यांचे लहान भाऊ लखन सिंग बघेल यांनी सांगितले की, सध्या त्यांच्या मोठ्या भावावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.त्याचा रक्तदाब 114/70 आहे. उपचाराला ते प्रतिसाद देत असून तो आता त्यांनी प्रकृती बरी आहे.