जळगाव : प्रतिनिधी
एका ५० वर्षीय महिलेला बँक ऑफ महाराष्ट्रच्या कस्टमर केअरमधून अधिकारी बोलत असल्याचे सांगून व्हाट्सअप वरील एप्लीकेशन लिंक पाठवून ती डाऊनलोड करण्याचे सांगून तीन जणांनी ८ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला महिलेच्या फिर्यादीवरून तीन अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील म्हसावद रोड वरील रामदास कॉलनीतील रहिवासी असलेल्या शर्मिला अनिल चिकाटे (वय ५०) या नोकरी करीत असून दि.४ ऑगस्ट 2023 रोजी चिकाटे यांच्या मोबाईल क्रमांकावर बँक ऑफ महाराष्ट्र च्या कस्टमर केअर मधून बोलत असून तुमची बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये गेलेली रक्कम मिळवून देण्याच्या आमिषाने तीन मोबाईल क्रमांकावरून संपर्क करून शर्मिला चिकाटे यांना व्हाट्सअप क्रमांकावर एप्लीकेशन ची लिंक पाठवून एप्लीकेशन डाउनलोड करण्यास सांगितले त्यानंतर शर्मिला यांच्या मोबाईल वरूनच त्यांनी त्यांच्या कॅनरा बँक खात्याची माहिती चोरून त्या खात्यामधून आठ लाख 55 हजार रुपयांची रक्कम ऑनलाईन काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. शर्मिला चिकाटे यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलीस स्टेशनला तीन मोबाईल धारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक बी डी जगताप करीत आहे.