Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भवरखेडे येथे कायदेविषयक शिबिर उत्साहात संपन्न
    धरणगाव

    भवरखेडे येथे कायदेविषयक शिबिर उत्साहात संपन्न

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 14, 2021Updated:November 14, 2021No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वार्ताहर भाईदास पाटील: तालुक्यातील भवरखेडे येथे कायदेविषयक शिबिर उत्साहात संपन्न झाले. जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाने दिवाणी व फौजदारी न्यायालय धरणगाव व तालुका वकील संघ यांच्यातर्फे भवरखेडे येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धरणगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश एस. डी. सावरकर साहेब होते.

    याबाबत सविस्तर माहिती अशी की, भवरखेडा येथे दिनांक १३/११/२०२१ रोजी सकाळी ११ वाजता सदर कार्यक्रम विठ्ठल मंदिर भवरखेडे बु. येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात धरणगाव न्यायालयाचे न्यायाधीश एस. डी. सावरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. तद्नंतर धरणगाव न्यायालयाचे न्यायाधीश सावरकर साहेब यांचा सत्कार गावचे सरपंच किरण पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. या कार्यक्रमाला वकील संघाचे एडवोकेट महेंद्र चौधरी यांनी वाटणी कशा पद्धतीने करण्यात येते याबाबत कायदेशीर मार्गदर्शन केले. “वडिलोपार्जित मालमत्तेत प्रत्येक वारसाचा मुलगी असो अथवा मुलगा यांना समान हिस्सा मिळत असतो”, याबाबत मार्गदर्शन केले. एडव्होकेट प्रशांत क्षत्रिय यांनी कायदेविषयक शिबिरात कौटुंबिक हिंसाचार या कायद्याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “सासऱ्याने सुनेला आपली मुलगी समजली पाहिजे”, असे केल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या कौटुंबिक हिंसाचाराबाबतचे गुन्हे घडत नाही. सागर महाराज यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, या कायदेविषयक शिबिरामुळे भवरखेडे येथील ग्रामस्थांना आज व्यापक प्रमाणात कायद्याबाबत माहिती मिळाली. धरणगाव न्यायालयाचे न्यायाधीश एस. डी. सावरकर साहेब यांनी कायदेविषयक शिबिरात अध्यक्षीय मनोगतातून मार्गदर्शन करतांना सांगितले की, आजकाल तरुण पिढी कायद्याचे पालन करत नाही. लहान मुलांना सुद्धा आई – वडील मोटर सायकल चालवणे बाबत परवानगी देत असतात. “संपत्तीपेक्षा मुलं संस्कारीत होणे जास्त अपेक्षित आहे”, वाटणी करणेबाबत तसेच कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्याबाबत योग्य अशी कायदेशीर माहिती दिली तसेच न्यायालयातील खरी वस्तुस्थिती सांगितली तर निश्चितच अन्यायग्रस्त पक्षकारास न्याय मिळतो. जसे की ४९८ या कायद्याबाबत खऱ्या अर्थाने त्रास दिलेला असेल यांची नावे फिर्यादी मध्ये दिल्यास निश्चितच न्याय मिळण्यास पक्षकारांना मदत होते. परंतु ज्या नातेवाईकांचा काही संबंध नसतो अशाही नातेवाईकांची नावे फिर्यादी मध्ये देण्यात येऊन त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न होत असतो. या कायद्याबाबत दुरुपयोग कसा होतो याबाबतही आपले मत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून धरणगाव वकील संघाचे एडव्होकेट व्ही. एस. भोलाने, एडव्होकेट सी. झेड. कट्यारे, एडव्होकेट मनोज दवे, एडव्होकेट डी. जे. माळी, एडव्होकेट प्रशांत पाटील यांच्यासह व्यासपीठावर भवरखेडे गावचे सरपंच किरण पाटील तसेच धरणगाव वकील संघाचे उपाध्यक्ष संदीप जी. सुतारे उपस्थित होते.

    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच किरण पाटील, उपसरपंच अजय ब्राह्मणे, ग्रा.प. सदस्य उगलाल पाटील, विजय सुर्यवंशी,-प्रशांत पाटील, खंडेराव भिल, विवरे येथील दिलीप पाटील व पिंटू पाटील मा.ग्रा.प.सदस्य शामकांत पाटील, संजय भामरे, ह.भ.प. शशिकांत महाराज, सागर महाराज, सतिश पाटील (युवा सेना प्रमुख), ग्रामसेवक संजीव पाटील, संजय भामरे, कृष्णकांत महाजन, गिरीश पाटील, वसंत लढे, सखाराम हरी, निलेश पाटील, कृष्णात सोनवणे, संतोष आप्पा, मुन्ना महाजन तसेच न्यायालयीन कर्मचारी सैंदाणे भाऊसाहेब, गणेश चौधरी यांनी परिश्रम घेतले. तसेच गावातील ग्रामस्थ, ग्रा.प. कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका उपस्थित होते. शिबिराला भवरखेडे गावातील महिला – पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन एडव्होकेट गजानन पाटील यांनी तर आभार प्रदर्शन सरपंच किरण पाटील यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सीसीटीव्ही व डम्प डेटामुळे दुचाकी चोरटे गजाआड; अमळनेर पोलिसांची मोठी कामगिरी

    January 28, 2026

    धरणगाव तालुक्यात अवकाळी पावसाचा व वादळाचा तडाखा; हजारो हेक्टरवरील मका-ज्वारी-गहू पिकांचे मोठे नुकसान

    January 27, 2026

    दोन अल्पवयीन शाळकरी मुलींची विहिरीत ढकलून हत्या; जिल्ह्यात खळबळ

    January 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.