जळगाव : प्रतिनिधी
खनिज विकास निधी अंतर्गत व्याज स्वरूपात महाराष्ट्र राज्य खनि कर्म महामंडळ मर्यादित नागपूर यांच्याकडे उपलब्ध असलेल्या रकमेपैकी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष बाधित क्षेत्रातील जळगाव जिल्ह्यात विविध विकास कामांकरिता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मंत्री द्वय व स्थानिक आमादारांच्या पाठपुराव्यामुळे 29 कोटी 87 लक्षच्या कामांना शासनाने नुकतीच प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिलेली असून यात जळगाव ग्रामीण मतदार संघातील जळगाव व धरणगाव तालुक्यात ७ कोटी २५ लक्ष निधीस मंजुरी मिळाली आहे. यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी बसण्याकरिता बेंचेस खरेदी करणे यासाठी ०५ कोटी रुपये तसेच साहित्यसह व्यायाम शाळा बांधकाम, गावअंतर्गत काँक्रिटीकरण, पेव्हिंग ब्लॉक बसविणे, कॉंक्रीट गटार बांधकाम , सुशोभीकरण व शौचालय बांधकाम करणे या महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे.
धरणगाव तालुक्यातील मंजूर कामे अशी
पाळधी येथे शौचालय बांधकाम करणे – ३० लक्ष , पोखरी येथे जि.प.शाळा व अंगणवाडी दुरुस्ती करणे – ४ लक्ष, पिंप्री येथे शौचालय बांधकाम करणे – ३० लक्ष, शेरी येथे जि. प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, पाळधी येथे कन्या उर्दू जि. प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, पाळधी बु येथे जि.प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, बोरगाव बु. येथे जि.प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, चांदसर येथे जि. प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, एकलग्न येथे जि. प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, चांदसर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र संरक्षण भिंत बांधकाम करणे – २० लक्ष, कवठळ येथे जि. प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, विवरे येथे जि. प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, दोनगाव येथे कॉंकटीकरण करणे – १० लक्ष
जळगाव तालुक्यातील मंजूर कामे अशी
धानवड येथे शौचालय बांधकाम करणे – ३० लक्ष, असोदा येथे शौचालय बांधकाम करणे – ३० लक्ष, विदगाव येथे काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष , विदगाव साहित्यसह व्यायाम शाळा बांधकाम करणे – १६ लक्ष, ममुराबाद येथे जि. प. शाळेची दुरुस्ती व शौचालय बांधकाम करणे – १० लक्ष , चिंचोली येथे जि. प. शाळा व अंगणवाडी दुरुस्ती करणे – ०४ लक्ष , तारखेडा जि. प. शाळा व अंगणवाडी दुरुस्ती करणे – ०४ लक्ष, भोलाणे येथे गाव अंतर्गत काँक्रीट करून करणे – १० लक्ष , भोलाणे येथे गावांतर्गत पेव्हिंग ब्लॉक/ काँक्रीट गटार/ कॉंक्रिटीकरण करणे – १० लक्ष, शेळगाव येथे गावांतर्गत वार्ड क्र. ३ मध्ये काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष, शेळगाव येथे वार्ड वार्ड क्र. ३ मध्ये काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष, धामणगाव येथे गावांतर्गत काँक्रीकरण करणे – १० लक्ष, धामणगाव येथे गावांतर्गत काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष, ममुराबाद येथे गावांतर्गत काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष, ममुराबाद येथे उमा नगर परिसरात काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष, ममुराबाद येथे गावांतर्गत पेव्हिंग ब्लॉक व कॉंक्रिटीकरण करणे – १० लक्ष, असोदा येथे इंदिरानगर भागात काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष , असोदा येथे वाल्मिक नगर परिसरात काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष, असोदा येथे वार्ड क्र.२ मध्ये कॉंक्रिटीकरण करणे – १० लक्ष, करंज येथे गावांतर्गत काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष, सावखेडा येथे गावांतर्गत काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष, असोदा येथे वार्ड क्र.२ मध्ये सामाजिक सभागृहाची दुरुस्ती करणे – १० लक्ष, फुपणी येथे जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी दुरुस्ती करणे – ०५ लक्ष ,देवगाव येथे जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी दुरुस्ती करणे – ०५ लक्ष, जवखेडा येथे जिल्हा परिषद शाळा दुरुस्त करणे – ०६ लक्ष, शिरसोली येथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे – ०५ लक्ष , असोदा येथे इंदिरानगर भागात काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष , ममुराबाद येथे काँग्रेस गटार बांधकाम करणे – १० लक्ष, खेडी येथे गावांतर्गत काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष , खेडी येथे शौचालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसवणे – १० लक्ष, फेसर्डी येथे कॉंकटीकरण करणे – १० लक्ष, पिलखेडा येथे काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष , कानळदा येथे काँकटीकरण करणे – १० लक्ष , कानळदा येथे काँक्रीट गटार बांधकाम व कॉंक्रिटीकरण करणे – १० लक्ष, किनोद येथे काँक्रीट गटार बांधकाम व कॉंक्रिटीकरण करणे – १० लक्ष, पळसोद येथे काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष, जामोद येथे काँक्रीट गटार बांधकाम व काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष, भादली खुर्द येथे गावांतर्गत काँक्रीट गटार व काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष, खेडी येथे, गावांतर्गत काँक्रीट गटार व काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष, नंदगाव येथे गावांतर्गत काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष
खेडी येथे काँक्रीट गटार बांधकाम करणे – ०६ , नांद्रा बुद्रुक येथे काँग्रेस गटार व काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष, किनोद येथे जि. प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, जळके येथे जि. प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, वावडदा येथे
जि. प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, कुसुंबा येथे जि. प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, धानवड येथे जि. प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, आसोदा येथे जि. प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, भादली येथे जि प उर्दू शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, फुपनगरी येथे जि. प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष , नवीन कुसुंबा जि प शाळा येथे दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, देव्हारी येथे जि. प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, उमाळे येथे जि. प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, कानसवाडे येथे जि. प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष