Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मनपा आयुक्त ॲक्शनमोडवर : तु माह्या मुलीसारखी हाय !
    जळगाव

    मनपा आयुक्त ॲक्शनमोडवर : तु माह्या मुलीसारखी हाय !

    editor deskBy editor deskAugust 3, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव शहरातील अनेक समस्या बाबत शहरात नुकतेच आंदोलन देखील केले होते. त्यानंतर आता आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी थेट प्रभागात जात पाहणी करीत समस्या सोडवत असल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे. यात अयोध्या नगरातील एका परिसरात आयुक्त गेले असता एका वृद्धा आजी बाईनी थेट माय, तु माह्या मुलीसारखी हाय, माह्या रस्ता करू दे…व! अशी प्रेमाने विनंती करीत एका आजीने जळगाव महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना आपल्या घराजवळील रस्ता दाखविला. गायकवाड सोपानदेव नगरमध्ये पाहणी करीत होत्या. अविश्‍वास ठरावाच्या स्थगितींनंतर बुधवारी त्यांनी रस्ते आणि गटारांच्या कामांची पाहणी केली.

    त्यांनंतर दि.२ रोजी दुसऱ्या महापालिका आयुक्त ॲक्शनमोडवर आल्या. सकाळी दहा वाजता त्या महापालिकेतील आपल्या कार्यालयात दाखल झाल्या. प्रशासकीय मान्यतेसाठी असलेल्या काही प्रस्तावार स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर शहरातील कामाच्या निवीदांना मंजूरी दिली. प्रभागातील पाहणीसाठी अधिकाऱ्यांसोबत आयुक्त रवाना झाल्या. शहरातील सोपानदेव नगरभागात जाऊन त्यांनी कामाची पाहणी केली. रामेश्‍वर कॉलनीतील काही रस्त्याची कामे झाली आहेत. त्याची बिले मंजुरीसाठी आलेली आहेत. त्या भागातील रस्ते व इतर कामाचीही त्यांनी आढावा घेतला. पिंप्राळा भागातील शिंदे नगर येथील नाल्याच्या समस्येची पाहणी करून कामाबाबत सूचना दिल्या. त्यांनी काही कामे तातडीने करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे उपस्थित होते.

    आपल्या पाहणी दौऱ्यात आयुक्तांनी नागरिकांशीही चर्चा केली. महिलांशी संवाद साधतांना एका आजीने प्रेमाने त्यांचा हात धरून आपल्या घराकडे घेवून गेल्या. त्या ठिकाणचा रस्ता दाखवून त्या म्हणाल्या माय, माह्या रस्ता करून दे..व! यावेळी त्यांच्या समवेत प्रभागातील नगरसेवक विरेन खडके होते. जनतेच्या प्रेमाने आयुक्तही भारावल्या व रस्ता लवकरात लवकर करून देईन, अशी ग्वाही त्यांनी आजींना दिली.

    #jalgaon manapa aayukt
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जळगाव तालुका अध्यक्षपदी सुमित पाटील व उपाध्यक्षपदी प्रविण पाटील यांची नियुक्ती

    February 5, 2026

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026

    दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.