Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुचाकीला डंपरची धडक ; चार वर्षाची मुलगी ठार !
    क्राईम

    दुचाकीला डंपरची धडक ; चार वर्षाची मुलगी ठार !

    editor deskBy editor deskAugust 3, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शाळेतून घरी जाणाऱ्या आईसह चार वर्षाच्या चिमुकलीसह भरधाव डंपरने उडविल्याची घटना घडली असून उपचारापुर्वी चिमुकलीचा दुदैवी मृत्यू झाला असून नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका आक्रोश केल्याचे पहायला मिळाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील माऊली नगरातील रहिवासी असलेले योगेश नेमाडे हे आपल्या पत्नी दक्षता, मुलगी प्रेरणा यांच्यासह राहण्यासाठी आहे. त्यांची चार वर्षाची मुलगी प्रेरणा योगेश नेमाडे (वय-४) हि जळगाव पब्लिक स्कूलमध्ये नर्सरी वर्गात शिकत आहे. नेहमीप्रमाणे प्रेरणाची शाळा सुटल्यानंतर तिची आई दक्षता या स्कूटी (एमएच १२ ईडब्ल्यू ८८२९) घेण्यासाठी गेल्या होत्या. मुलगी प्रेरणाला स्कूटीने घरी घेवून जात असतांना राष्ट्रीय महामार्गावारील हॉटेल तनय जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या डंपर (एमएच १९ सीवाय ६७६९) ने जोरदार धडक दिली. या धडकेत चिमुकली प्रेरणा गंभीर जखमी झाली. तिला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन महाजन यांनी मयत घोषीत केले. दरम्यान, डंपर चालक डंपर सोडून पसार झाला होता. एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पुढील कारवाई करण्यात येत आहे. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.  एमआयडीसी पोलीस ठाण्यात कारवाई करण्याचे काम सुरू होते.

    #accident #jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जळगाव तालुका अध्यक्षपदी सुमित पाटील व उपाध्यक्षपदी प्रविण पाटील यांची नियुक्ती

    February 5, 2026

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026

    दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.