जिल्हा परिषद , पंचायत समिती आरक्षण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा बँकेचे निवडणुक पार पडत नाही तोच मिनी विधानसभा निवडणुकीचे आरक्षण सोडत जाहीर होणार आहे यामुळे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्ता व नेता यांचे लक्ष मिनी विधानसभेकडे राहणार आहे यामिनी विधानसभेत गेल्या वेळेस भाजपाला काठावर बहुमत मिळाले होते त्यांनी काँग्रेसची काठी घेऊन आपले बहुमत सादर केले होते मात्र या वेळेस महाविकासआघाडी होणार की प्रत्येक पक्ष भविष्यातील विधानसभा व लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपल्या पक्षाची ताकद त्याची चाचपणी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे यात सर्व पक्षांची ताकद जरी लागणार असली तरी दोन नेत्यांचे कसब पणाला लागणार हे मात्र निश्चित आहे.
मिनी मंत्रालय च्या निवडणुकीचा बिगुल वाजला असल्याने येत्या काळात होणाऱ्या निवडणुकीमध्ये मिनी मंत्रालय वर कोणाचा झेंडा फडकणार हे पाहणे महत्त्वाचे राहील गेल्या वेळच्या निवडणुकीत भाजपाकडून एकनाथराव खडसे व गिरीश महाजन या दोन्ही नेत्यांनी मिनी मंत्रालय वर आपला कब्जा केला होता मात्र या वेळेस दोन्ही नेत्यांमध्ये खूप पडलेली असल्याने भाजपाला जे काठावर बहुमत मिळाले होते ते पुन्हा मिळवता येईल का हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी मध्ये गेलेले एकनाथराव खडसे यांच्या मदतीला जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश पाटील आमदार अनिल भाईदास पाटील हे दिग्गज नेते राहणार आहे तर शिवसेनेकडे विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी येणार यात काही शंका नाही या निवडणुकीत जास्तीत जास्त जागांवर शिवसेनेचा झेंडा करण्याचा त्यांचा मानस राहील यात काही शंका नाही यात त्यांना आमदार चिमणराव पाटील आमदार किशोर पाटील यांच्यासह अनेक शिवसेनेचे पदाधिकारी यांचे सहकार्य लाभेल तसेच शिवसेनेचे चारही जिल्हाप्रमुखावर आपापल्या क्षेत्रात जास्तीत जास्त जिल्हा परिषद उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी ही राहणार आहे
जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे .जिल्हा परिषद , पंचायत समिती आरक्षण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातहोणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे .राज्यातील ‘मिनी विधानसभा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामीण भागातील जीवनदायिनी जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणुक 2022 गट व गण रचना, आरक्षण सोडत ही डिंसेबरच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती लाईव्ह महाराष्ट्र न्यूज’ ला दिली आहे.तर आचार सहिंता ही 15 जानेवारीच्या दरम्यान राज्यात लागू होणार आहे.ग्रामीण भागातील आखाड्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. राज्याच्या राजकारणात बदल घडवण्याची ताकद जिल्हा परिषद राजकारणात आहे. कामाची कसोटी गेल्या पाच वर्षात केलेलं काम याच्या आधारावर या निवडणुका होत असतात.
आरक्षण सोडत झाल्यानंतर खऱ्या अर्थाने लढती स्पष्ट होतील. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने ही आघाडी ग्रामीण भागात होणं कदापि शक्य नसल्याने, जवळजवळ सर्वच पक्ष स्वबळावर लढणार असल्याने राज्यात नंबर एक कोण याचा कस खऱ्या अर्थाने लागणार आहे.
राज्यातील काही जिल्ह्यात स्थानिक आघाडी किंवा पक्षीय बलाबल बघून निर्णय घेतले जातात. अनेक ठिकाणी युती आघाडी सोयीनुसार होणार असतात. येत्या निवडणुका ह्या विकासाच्या मुद्द्यावर लढवल्या जाता की जातीय धुर्विकरण होत हे बघणे महत्त्वाचे आहे.राज्यात आघाडीचे सरकार तर केंद्रात भाजपचे सरकार यामुळे राजकीय चिखलफेक जोमात होणार यात शंका नाही.