• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

नितीन देसाई यांचे अंत्यसंस्कार होणार स्टुडीओमध्ये ; पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर !

editor desk by editor desk
August 3, 2023
in राष्ट्रीय
0
नितीन देसाई यांचे अंत्यसंस्कार होणार स्टुडीओमध्ये ; पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर !

बॉलिवूड कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले होते.प्राथमिक पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये देसाई यांचा फाशीमुळे मृत्यू झाला असल्याची बाब समोर आली आहे. नितीन देसाई यांचे बुधवारी 4 डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन केले. प्राथमिक तपासात मृत्यूचे कारण फाशी असल्याचे रायगड पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. तत्पूर्वी खालापूर पोलिसांनी नितीन देसाई यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात आणला होता. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील स्टुडिओमध्ये ते मृतावस्थेत आढळले.

रायगडचे एसपी सोमनाथ घार्गे यांनी बुधवारी रात्री माहिती दिली की, नितीन देसाई यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार त्यांचा अंत्यसंस्कार एनडी स्टुडिओमध्ये होणार आहे. स्टुडिओमध्ये सापडलेले साहित्य जप्त करण्यात आले असून त्याची तपासणी करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी त्यांच्या केअरटेकर आणि ड्रायव्हरचे जबाबही घेतले आहेत.

नितीन देसाई यांचे पार्थिव बुधवारी संध्याकाळी एनडी स्टुडिओतून मुंबईतील जेजे रुग्णालयात नेण्यात आले. नितीन देसाई यांचे पार्थिव बुधवारी संध्याकाळी एनडी स्टुडिओतून मुंबईतील जेजे रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी सांगितले- सकाळी 9 वाजता मृतदेह दोरीला लटकलेला आढळला नितीन देसाई यांचा मृतदेह दोरीला लटकलेल्या अवस्थेत सकाळी नऊच्या सुमारास आढळून आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. घटनेची माहिती मिळताच श्वान पथक तेथे पोहोचले. प्रत्येक अँगलमधून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांना नितीन यांच्या मोबाइलमधून एक ऑडिओ क्लिप मिळाली असून त्यात 4 जणांचा उल्लेख आहे. त्यांच्या दबावाखाली नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. लवकरच त्यांचा जबाब नोंदवला जाईल.

Tags: antaysanskarNitin desaistudio
Previous Post

निसर्गकवी जेष्ठ कवी ना.धो.महानोर हरपले !

Next Post

विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी पोहचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

Next Post
विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी पोहचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी पोहचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group