जळगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे निसर्गकवी, प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळख असलेले जेष्ठ कवी ना.धो.महानोर यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला आहे. त्यांचे दीर्घ आजाराने आज सकाळी ८.३० वाजता रुबी हॉस्पिटल पुणे येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या रूपाने एका प्रतिभाशाली आणि आपल्या शब्दांनी समृद्ध करणारा कवी आणि भूमिपुत्र हरपला आहे.
ना.धो.महानोर यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुका पळसखेड येथे दि.१६ सप्टेंबर १९४२ रोजी झाला आहे. मराठी कवी, गीतकार, शेतकरी व माजी आमदार आहेत. महानोर यांनी आपल्या साहित्यात काहीवेळा मराठीच्या बोलीभाषांचा वापर केला आहे. ना. धों. महानोर यांच्या कवितांनी बालकवी व बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला. ना.धों. महानोरांचे ‘पानझड’, ‘तिची कहाणी’ ‘पळसखेडची गाणी म्हणजे मराठवाडी लोकगीतांचा खजिना. त्यांच्या ‘रानातल्या कवितां’ना खरा मातीचा गंध येतो.