Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात इन्स्टाग्रामवर महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट यूजर्सविरुद्ध गुन्हा !
    क्राईम

    जळगावात इन्स्टाग्रामवर महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट यूजर्सविरुद्ध गुन्हा !

    editor deskBy editor deskAugust 3, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

     

    जळगाव इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साइटवर राष्ट्र पुरुषांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी शिवाजीनगर हुडको भागातील एकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात २ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

     

    मिळालेल्या माहितीनुसार. महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेला व शिवाजी नगर हुडको परिसरातील रहिवासी प्रशिक दीपक ससाने ( वय १८) हा १ ऑगस्ट रोजी त्याच्या मोबाइलमध्ये इन्स्टाग्रामवर रिल्स पाहत असताना एका अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केलेला दिसला. सदर व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये एका नावाच्या इन्स्टाग्राम आयडीवरून तीन दिवसांपूर्वी अश्लील व आक्षेपार्ह कमेंट केलेली होती. सदर कमेंट ही राष्ट्रपुरुषांविषयी असल्याची खात्री झाल्याने तरुणाने समाज बांधवांना सांगितले. शिवराळ भाषेमुळे समाजाच्या भावना दुखावल्या असून, दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतुनेच सदर पोस्ट केल्याचा उद्देश लक्षात आल्याचे समाजबांधवांचे म्हणणे आहे. सदर इन्स्टाग्राम आयडी संबंधितांनी तपासला असता तो शिवाजीनगर, हुडको भागात राहणाऱ्याचा असल्याचे लक्षात आले. त्यामुळे प्रशिक ससाने याने २ ऑगस्ट रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    #jalgaon aaksheparh post Instagram social media
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भडगावात ड्रग्जचा धक्का : कारमधून १० पुडी MD जप्त, महिला सहित दोघे ताब्यात

    March 23, 2026

    पाचशे रुपयांसाठी रक्तरंजित हल्ला; जळगावात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

    March 23, 2026

    भरधाव कंटेनरची भीषण धडक; प्रतिष्ठित शेतकरी जागीच ठार

    March 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.