धरणगाव : प्रतिनिधी
धरणगाव तालुक्यातील गंगापुरी गावातील दलित वस्ती अंतर्गत असलेले सार्वजनिक शौचालयाची पाण्याची टाकी व पाणीपुरवठा विहिरीची वरचा लोखंडी पाईप व सत्तर फूट वायर व फिल्टरची प्लॅनरची कॉइन बॉक्स चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी ग्रामस्थांनी पोलीस उपनिरीक्षक यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की मौजे गंगापुरी येथे दलित वस्ती अंतर्गत सार्वजनिक शौचालयावरील सेलिस्टच्या पाण्याची टाकी व पाणीपुरवठा विहिरीवरील लोखंडी पाईप तसेच सत्तर फूट वायर टाटा व फिल्टर प्लॅनर कॉइन बॉक्स कुलूप तोंडून आतील चिल्लर चोरांनी इत्यादी साहित्य लंपास केले असून अनोळखी चोरांना योग्य लवकरात लवकर पकडून योग्य ती कारवाई व्हावी यासाठी पोलीस उपनिरीक्षक यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे हे निवेदन सरपंच राधिका निंबाजी पाटील, उपसरपंच भारतीय गोकुळ पाटील, ग्रामसेविका मनीषा साळुंखे यांच्या पत्रावरती देण्यात आले आहे.