Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावातून बाल विवाह प्रतिबंधक अभियानास सुरुवात
    धरणगाव

    धरणगावातून बाल विवाह प्रतिबंधक अभियानास सुरुवात

    editor deskBy editor deskAugust 2, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    बाल विवाह थांबवणे जनजागृती अभियान माननीय नायब तहसीदार लक्ष्मण सातपुते व सहाय्यक गट विकास अधिकारी कैलाश पाटील तसेच प्रकल्प अधिकारी वर्ल्ड व्हिजन इंडिया जितेंद्र गोरे यांच्या हस्ते बाल विवाह थांबवणे जनजागृती अभियान मोहीम कार्यास हिरवे झेंडे दाखवून कार्यक्रमाला आज सुरुवात करण्यात आली.
    या वेळेस महसूल विभाग व पंचायत समिती येथील प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. हे जनजागृती अभियान धरणगाव तालुक्यातील एकूण 30 गावामध्ये हे अभियान राबवण्यात येईल. या वेळेस माननीय नायब तहसिलदार तथा दंडाधिकारी लक्ष्मण सातपुते साहेबांनी या जाणीव – जागृती अभियानाला शुभेच्छा देऊन बाल विवाह थांबवला पाहिजे या शासनाच्या अभियानाला आपण सगळ्यांनी हात भार लावला पाहिजे व या अभियानास प्रत्येक घरा घरात व गाव गावात ही माहिती पुरवली पाहिजे व मुलांचे संरक्षण केले पाहिजे. तसेच मा. कैलाश पाटील साहेबांनी शुभेच्छा देऊन या कार्यक्रमासाठी प्रत्येक व्यक्तीने पुढे यावे व बाल विवाह थांबवला पाहिजे असे आव्हान केले. त्याचबरोबर प्रकल्प अधिकारी वर्ल्ड व्हिजन इंडिया मा. जितेंद्र गोरे त्यांनी बाल विवाह थांबवणे जाणीव – जागृती अभियानास आपण सगळ्यांनी मिळून प्रत्येक गावात ही माहिती पुरवली पाहिजे व बाल विवाह थांबवला पाहिजे व मुलांच्या सार्वांगिक विकासासाठी आपण ऐकत्र आले पाहिजे असे आव्हान केले. हा बाल विवाह थांबवणे जनजागृती अभियान मोहीम एकून 30 गावात एक सप्ताह पर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमासाठी वर्ल्ड व्हिजन चे कर्मचारी अंकिता मेश्राम, रतीलाल वळवी, अश्विन इक्का, विजेश पवार. तसेच स्वयंसेवक जितेंद्र पाटील, आरती पाटील, वैष्णवी पाटील आदी उपस्थित होते.

    Balvivah kayada dharangav Janjagruti abhiyan
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धरणगावात बेकायदेशीर राहणाऱ्या इराणी महिलेची होणार भारतातून हकालपट्टी !

    February 3, 2026

    धरणगाव तालुक्यात वादळ-पावसाचा कहर; रब्बी पिके भुईसपाट

    January 31, 2026

    धरणगाव तालुक्यात अवकाळी पावसाचा व वादळाचा तडाखा; हजारो हेक्टरवरील मका-ज्वारी-गहू पिकांचे मोठे नुकसान

    January 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.