लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने भुसावळ शहरात सात रोजी सायंकाळी केलेल्या कारवाईत गावठी कट्टा सह 85 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
भुसावळ शहरात नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील वरीष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम, सहा.निरीक्षक सचिन जाधव, एएसआय बशीर गुलाब तडवी, रामचंद्र बोरसे, नाईक नितीन सपकाळे, नाईक प्रमोद मंडलिक, नाईक मनोज दुसाणे, चालक सुरेश टोंगारे आदींच्या पथकाने धडक कारवाई करीत गावठी कट्टा बाळगणारे शेख ताहेर शेख आजाद आणि शेख रीजवान शेख इलियास (दोन्ही रा. मुस्लिम कॉलनी) या दोघांच्या मुसक्या आवळल्या. ईदगाह रोडवरील हिरा हॉलजवळ गुरूवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. दोघांविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींकडून 25 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा, 15 हजार रुपये किंमतीचे मोबाईल, 45 हजार रुपये किंमतीची रीक्षा मिळून 85 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.