Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रात्रीच्या सुमारास अमळनेरात दुकानाला भीषण आग !
    अमळनेर

    रात्रीच्या सुमारास अमळनेरात दुकानाला भीषण आग !

    editor deskBy editor deskAugust 2, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    अमळनेर शहरातील तिरंगा चौकात दुकानाला अचानक आग लागून साठ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ३१ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. आग विझवताना अग्निशमन दलाच्या तिघांना विजेचा धक्का बसला. मात्र सुदैवाने त्यांचे प्राण वाचले.

    मिळालेल्या माहितीनुसार, तिरंगा चौकात येथील भाऊसाहेब गुलाबराव महाजन यांचे कांचन कॉस्मेटिक व जनरल स्टोअर्सचे दुकान असून ३१ रोजी रात्री त्यांना शेजारील हेमनदास पंजाबी यांचा फोन आला की, दुकानातून धूर निघत आहे. भाऊसाहेब महाजन दुकानावर पोहचले. त्यांनी शटर उघडले असता आगीच्या मोठ्या ज्वाळा निघत होत्या. आगीचे रौद्र रूप पाहून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे नितीन खैरनार, दिनेश बिन्हाडे, जफर खान, फारुख शेख, आनंदा झिम्बल, मच्छिंद्र चौधरी, परेश उदेवाल आग विझवत होते. यावेळी वीजपुरवठा बंद करण्यासाठी महावितरण कंपनीला फोन करण्याचा प्रयत्न केला असता कोणीही फोन उचलला नाही. तशाही परिस्थितीत आग पसरू नये म्हणून पाणी फवारणे आगीत वीज जोडणी उघडी पडल्याने उघड्या वायरवर पाण्याचा फवारा जाताच स्पार्किंग झाले आणि नितीन खैरनार, दिनेश बिन्हाडे व मच्छिंद्र चौधरी या तिघांना विजेचा शॉक बसला. सुदैवाने त्यांचे प्राण बचावले. त्यानंतर काही वेळात वीजपुरवठा बंद करण्यात आला आणि संपूर्ण आग विझवण्यात आली. शेजारच्या दुकानामधील साहित्य बाहेर काढण्यात आले. आगीचे प्रमाण एवढे मोठे होते की, आग विझवण्यासाठी तीन बंब बोलावण्यात आले होते. दुकानातील सर्व कॉस्मेटिक व प्लास्टिक साहित्य जळून ५० हजाराचे नुकसान झाले. घटनास्थळी पोलिस निरीक्षक विजय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोळे, रवींद्र पाटील यांनी भेट दिली. अमळनेर पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. शॉर्टसर्किटने आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. तपास हेडकॉन्स्टेबल संजय पाटील हे करीत आहेत.

    agnishaman Amlaner General store
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खळबळजनक : पत्नीसह प्रियकराने अपशब्द वापरल्याने पतीने संपविले आयुष्य !

    February 4, 2026

    शॉर्ट सर्किटमुळे अमळनेरात आग; नागरिक व अग्निशामक दलाच्या सहकार्याने आगीवर नियंत्रण

    February 2, 2026

    दोन-अडीच लाखांच्या कर्जाने घेतला जीव; शेतकरी आत्महत्येने हळहळ

    January 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.