Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खळबळजनक : दोन दिवसापासून बेपत्ता मुलीचा मृतदेह सापडला !
    क्राईम

    खळबळजनक : दोन दिवसापासून बेपत्ता मुलीचा मृतदेह सापडला !

    editor deskBy editor deskAugust 2, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव : प्रतिनिधी

    भडगाव तालुक्यातील कजगाव येथील बालिका दि. ३० रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार भडगाव पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती. तिचा मृतदेह गोंडगाव येथील गोठ्यात कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्यात मिळून आला. रात्री उशिरा घटनास्थळी पोलिसांचा ताफा दाखल झाला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, गोंडगाव येथील कल्याणी संजय पाटील ही आठ वर्षाची बालिका बेपत्ता झाल्याची तक्रार दि. ३० रोजी सायंकाळी भडगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली. या बालिकेचा तपास सुरू असतानाच मंगळवारी गोठ्यात कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्यात तिचा मृतदेह सापडला. ही माहिती मिळताच सहाय्यक पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पोलिस उपविभागीय अधिकारी अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, कजगाव पोलीस मदत केंद्राचे छबुलाल नागरे, नरेंद्र विसपुते, भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली आहे.

    Bhadgaon police Crime
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026

    दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !

    February 5, 2026

    फिरायच्या बहाण्याने नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.