जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षांपासून लाच घेण्याचे प्रमाण शासकीय विभागात मोठ्या प्रमाणात होत असून यावर जळगाव एसीबीचे पथक कारवाई करीत आहेत. नुकतेच बोदवड येथे रेशन कार्ड वर आईचे व मुलाचे नाव कमी करण्यासाठी व नवीन रेशन कार्ड तयार करून देण्यासाठी एक हजारांची लाच मागून ती स्वीकारल्याने बोदवड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचा लिपिक उमेश बळीराम दाते, (55, बोदवड) यास जळगाव एसीबीच्या पथकाने कार्यालयातच रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, एएसआय दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, कॉन्स्टेबल राकेश दुसाने आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.