प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: कोरोना च्या काळामध्ये बंद असलेल्या शाळा बऱ्याच कालावधीनंतर शासनाच्या आदेशानंतर सुरू झाल्या आहे याचा आनंद शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्या मुखावर दिसून येत आहे यासाठीच हिरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये वर्गखोल्या यांसह संपूर्ण शाळा फुलांनी सजवून विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले.
कोरोना या काळात बंद असलेल्या शाळा दिवाळीच्या परवा नंतर सुरू झाल्या यासाठी शिक्षकांनी मैदानासह शाळेतील संपूर्ण वर्ग सजवले आज हिरा इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शिक्षकांसह शाळा हि सजली होती.
हिरा इंटरनेशनल स्कूल, धरणगांवचे
उपस्थित शिक्षक – प्राचार्य जयेशकुमार मेहता, उपशिक्षक – लतिका मेशरी, अग्नेश जोश, पूजा सिंधी, ललिता पाटिल, प्रणीता येवले, रोहिणी पाटिल, राधिका काबरा, अश्विनी शिंपी, करुणा साळूंखे, तसेच क्रीड़ा शिक्षक निलेश पाटिल व लिपिक मनोहर सोनवणी, गणेश चव्हाण हे उपस्थित होते.शाळेच्या विद्यार्थांच्या स्वागतासाठी शाळेच्या आवार व वर्गखोल्या सजवण्यात आल्या होत्या. विद्यार्थांचे स्वागत करून वर्ग सुरु करण्यात आले.सदरच्या उपक्रमाच्या यसस्वीतेसाठी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारि यांनी परिश्रम घेतले.