नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक महिलासह तरुणीवर अत्याचाराचे प्रमाण वाढत असतांना एकच भयानक प्रकरण समोर आले आहे. चक्क तरुणाने आपल्या काकू घरात एकटी असल्याची संधी साधत शरीर संबध करायची मागणी केली पण काकूने नकार दिल्याने संतापलेल्या पुतण्याने चक्क काकूचे डोके भीतीवर आदळून ठार केल्याची घटना तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई शहरातील कोडुंगैयूरमध्ये ४८ वर्षीय काकूसोबत तरुणाला शरीर संबंध ठेवायचे असल्याने काकूने त्याच्या या मागणीला नकार दिल्याने पुतण्याने रागाच्या भरात काकूचे डोके भिंतीवर जोरदार आदळले. यात काकू गंभीर जखमी झाल्यवर देखील तरुणाने तिला किस करीत पुन्हा पुन्हा तिचे डोके भिंतीवर आदळून तिला ठार केले. हा तरूण इतक्यावर थांबला नाही तर काकुच्या मृतदेहासोबत चुकीचे स्पर्श करीत राहिला. हि घटना घडल्यानंतर काही तासांनी तरूण तेथून फरार होण्यात यशस्वी झाला. हि घटना जशी पोलिसात पोहचली तसे पोलिसांनी आरोपीच्या शोधात असतांना आरोपी पुतण्या सापडला देखील त्याचे नाव ऑगस्टिन अरुण असल्याचे समजते.