धरणगाव : प्रतिनिधी
राज्यात पावसाचा हाहाकार सुरु असतांना अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतांना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात देखील एका शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. या शेतकरीचा एक बैल विजेचा शौक लागल्याने मृत पावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील शेतकरी दीपक हेमराज पाटील यांचा १ बैल दि.३१ रोजी विजेचा शौक लागल्याने जागीच गतप्राण झाल्याने शेतकरीचे नुकसान झाले आहे. याबाबत सादर पंचनामा पशुवैदकीय अधिकारी यांनी केला असून सदर शेतकरीस शासनाकडून मदत व्हावी अशी देखील मागणी यावेळी करण्यात आलेली आहे.