Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात चोरटे आले अन घर साफ करून पळाले !
    क्राईम

    जळगावात चोरटे आले अन घर साफ करून पळाले !

    editor deskBy editor deskAugust 1, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील जिजाऊ नगर येथील प्रकाश खैरनार यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अनोळखी चोरट्यांनी रोख रकमेसह सोने चांदीचे दागिने मिळून एकूण ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लांबविलयाची घटना उघडकीस आली. याप्रकरणी ३१ जुलै रोजी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सावखेडा शिवारातील जिजाऊ नगरातील रहिवासी प्रकाश खैरनार यांच्या सासूंचे २९ जुलै रोजी रात्री निधन झाले. त्यामुळे खैरनार कुटुंबीय रात्री ११ वाजता मालेगाव येथे गेले. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले होते. ३० रोजी सकाळी शेजारील महिलेला खैरनार यांच्या घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यामुळे त्यांनी या विषयी माहिती दिली. सोबतच पोलिसांनाही या विषयी माहिती देण्यात आल्याने तालुका पोलिस ठाण्याचे परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक अप्पासाहेब पवार, पोहेकॉ विश्वनाथ गायकवाड, अनिल मोरे, दिनेश पाटील, उमेश ठाकूर, अनिल फेगडे हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी पाहणी करून श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनाही बोलवून घेतले. मात्र घरमालक बाहेर गावी असल्याने नेमका किती मुद्देमाल गेला, हे समजू शकत नव्हते. खैरनार कुटुंबीय ३० रोजी रात्री घरी परतले त्यावेळी पाहणी केली असता घरातील २० हजार रुपये रोख, ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल, ५ चांदीचे शिक्के, २०० ग्रॅम वजनाची महालक्ष्मी मातेची मूर्ती असा एकूण ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे लक्षात आहे. या प्रकरणी खैरनार यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

    #jalgaon chori taluka police
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026

    दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !

    February 5, 2026

    फिरायच्या बहाण्याने नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.