भडगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील सात वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखी इसमाने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भडगाव तालुक्यातील एका गावातील सात वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दिनांक 30 जुलै रोजी च्या सुमारास अनोळखी इसमाने काहीतरी कारणाने कायदेशीर रखवालीतून फुस लावत पळवून नेल्याची घटना घडली आहे याप्रकरणी भडगाव पोलीस स्थानकात अनोळखी समाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर हे करीत आहे