जळगाव फर्स्टचे समन्वयक डॉ. राधेश्याम चौधरी यांचा पत्रकार परिषदेत आरोप
जळगाव (प्रतिनिधी ) शहर महापालिकेत प्रलोभने दाखवून सत्तांतर झाले. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेत एकाच कुटुंबातील दाम्पत्य असलेल्या विरोधी पक्ष नेता आणि महापौर पद असणे लज्जास्पद असल्याचा आरोप जळगाव फर्स्टचे समन्वयक डॉ. राधेश्याम चौधरी यांनी केला असून नैतिकतेच्या आधारे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी डॉ. चौधरी यांनी केली आहे. विरोधी पक्षनेतेपदी राहून सुनील महाजन यांनी नैतिकता बासनात गुंडाळली आहे. हे जनतेच्या हितासाठी नाही . सत्तेत शिवसेना आहे . मग विरोधी पक्षनेतेपदी असताना जनतेच्या हिताच्या मुद्द्यांवर आवाज उठविला आहे. मनपातील कोणता प्रश्न चव्हाट्यावर आणला आहे का ? समितीमध्ये महापौरांचा समावेश व्हावा अशी सुनील महाजन यांनी मागणी केली. लाखो रुपयांचे टेंडर प्रक्रियेत महाजन दाम्पत्यांनी ते मंजूर केला असल्याचा आरोप केला आहे. टेंडर प्रक्रियेत महापौर आणि उपमहापौरांची शिफारस , हा अट्टहास कशासाठी ? असा सवालही डॉ. चौधरी यांनी केला आहे. जनतेचे रक्षकच हे भक्षक झाल्याचा आरोप देखील डॉ. राधेशाम चौधरी यांनी केला आहे.