लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा बँक निवडणुकीत रावेर तालुक्यातील सोसायटी मतदार संघातून अनेक उमेदवार रिंगणात उतरले होते. मात्र माघारीनंतर राष्ट्रवादीचे माजी आमदार अरुण पाटील काँग्रेसचे राजीव पाटील व महाविकास आघाडीच्या जनाबाई पाटील हे रिंगणात होते मात्र जनाबाई पाटील व काँग्रेसचे राजीव पाटील यांनी माजी आमदार अरुण पाटील यांना पाठिंबा दिल्यामुळे रावेर विकासाची जागेवर माजी आमदार अरुण पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर काँग्रेसचे राजीव पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या रणनीती वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
जिल्हा बँक संचालक पदाच्या निवडणुकीमध्ये अनेक घडामोडी होताना दिसून येत आहे यात रावेर विकास मतदारसंघाच्या जागेसाठी काँग्रेस पक्षाने हट्ट धरला होता व आपला उमेदवार दिला होता तो महाविकास आघाडीचे उमेदवार जनाबाई पाटील यांनी दोन दिवसापूर्वीच आपला पाठिंबा माजी आमदार अरुण पाटील यांना दिला होता तर आज काँग्रेसचे राजीव पाटील यांनीसुद्धा पत्रकार परिषद घेऊन माजी आमदार अरुण पाटील यांना जाहीर पाठिंबा दिल्याची घोषणा केली यामुळे रावेर विकास मधून अरुण पाटील हे बिनविरोध संचालकपदी निवडले गेले आहे.
काँग्रेसचे उमेदवार राजीव पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले आहे त्यांनी यावेळी सांगितले की काँग्रेसच्या बैठकीमध्ये स्वभावाचे लढण्याची वेळ आल्यास प्रत्येकाने आपल्यात तीनुसार मतदारसंघातून अर्ज भरून ठेवण्याचे सूचना मिळाल्या होत्या महाविकास आघाडी तून काँग्रेसच्यावतीने रावेर तालुक्यातील जनाबाई महाजन यांना उमेदवारी दिल्यास देण्यात आली होती मात्र त्यांनीही माघार घेतल्याने काँग्रेसचे नेते आपल्याला संपर्क करतील म्हणून आपण दोन दिवस वाट पाहत होतो कोणीही माझ्याशी संपर्क केला नाही आज जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा एकही उमेदवार राहिलेला नाही अशी खंतही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली व ते पुढे म्हणाले की हा आमच्या घरातला प्रश्न आहे याबाबत काँग्रेसचे एकमेव आमदार शिरीष चौधरी यांना भेटणार असून त्यांना काही प्रश्नांची उत्तरे व मनातील शंका विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले तिथे समाधान न झाल्यास काँग्रेसच्या प्रदेश कमिटी या केंद्राच्या कमिटीकडे आपण याबाबत विचारणा करणार असल्याचेही यावेळी पाटील यांनी डॉक्टर सुरेश पाटील चोपडा तून उभे आहेत त्यांच्यामागे काँग्रेसने आपली पूर्ण ताकद उभी करावी अशी आशा व्यक्त केली आहे.
या संदर्भात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी अरूण पाटील आणि राजीव पाटील यांच्यासह जिल्हा बँक संचालक संजय पवार, पराग पवार यांची देखील उपस्थिती होती. याप्रसंगी राजीव पाटील यांनी माघारीबाबतची भूमिका स्पष्ट केली.
काय म्हणाले मा.आमदार
अरूण पाटील म्हणाले की, आपण दोनचा आमदार होतो. तसेच सहकारातही अनेक पदे भूषविली आहेत. २००५ साली जिल्हा बँक संचालक म्हणून अल्प काळ काम करण्याची संधी मिळाली. २००८ साली मला जिल्हा बँक निवडणुकीत फक्त चार मतांनी पराभव स्वीकारावा लागला. या अनुषंगाने गेल्या एक वर्षापासून आपण तयारी करत आहोत. मात्र महाविकास आघाडी पॅनलमध्ये स्थान मिळण्यात अडचणी आल्या. मात्र, आधी जनाबाई गोंडू महाजन आणि नंतर राजीव पाटील यांनी माघार घेतल्यामुळे आपला विजय निश्चीत झाला आहे. यापुढे आपण शेतकरी हितासाठी कार्य करत राहू अशी ग्वाही अरूण पाटील यांनी याप्रसंगी केली.
जिल्हा बँक निवडणुकीच्या रिंगणात अनेक नाट्यमय घटना घडल्या. यात यावल आणि रावेरच्या जागेबाबत बराच काथ्याकुट करण्यात आला. अखेरच्या क्षणाला महाविकास आघाडीने जनाबाई गोंडू पाटील यांना कॉंग्रेसच्या कोट्यातून उमेदवारी जाहीर केली. तर कॉंग्रेसचेच राजीव पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार अरूण पांडुरंग पाटील यांनी देखील उमेदवारी अर्ज कायम ठेवले. यात अरूण पाटील यांना थेट भाजपनेच पुरस्कृत केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले दरम्यान, माघारीची मुदत उलटून गेल्यानंतर जनाबाई गोंडू महाजन यांनी दोन दिवसांपूर्वीच अरूण पांडुरंग पाटील यांना पाठींबा दिल्याने खळबळ उडाली. तर आज दुसरे उमेदवार राजीव पाटील यांनी देखील अरूण पाटलांना पाठींब्याचे पत्र दिले आहे. यामुळे रावेर तालुका सोसायटी मतदारसंघातून अरूण पांडुरंग पाटील यांनी बिनविरोध निवड निश्चीत झाली आहे.