अकोला : वृत्तसंस्था
अकोला जिल्ह्यातील महान या गावातील पती-पत्नीचा कुलरचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुलरमधील विजेच्या प्रवाहाच्या जोरदार झटक्यामुळे दोघांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. प्रभाकर बापूराव जानोरकार व निर्मलाबाई प्रभाकर जानोरकार असे यामध्ये मृत पावलेल्या दुर्दैवी पती – पत्नीची नावे आहेत. हे दोघेही अकोला जिल्ह्यातील महान गावातील रहिवाशी होते. जानोरकार यांच्या घरातील कुलरमध्ये आलेल्या वीज प्रवाहामुळे दोघांचा दुर्दैवी अंत झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.


