लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने दिवाळीच्या पुर्व संध्येला पेट्रोल व डिझेल वरील एक्साईज कर प्रतिलिटर अनुक्रमे ५ व १० रुपयांनी कमी जनतेला मोठा दिलासा दिला होता. सदर दर कमी करण्यात यावे यासाठी कॉंग्रेस व सर्व विरोधी पक्षांनी मोठमोठी आंदोलने केली होती, परंतु केंद्र सरकारने दर कमी केल्या नंतर भाजपा शासित राज्ये वगळता कोणत्याही राज्याने पेट्रोल व डिझेल वरील दरात कपात केलेली नाही, यासाठी भाजपा जळगांव च्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.
यावेळी माजी मंत्री आ. गिरीषजी महाजन, खासदार रक्षाताई खडसे व भाजपा जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव येथे राज्यातील मविआ सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
मोदी सरकारने ज्याप्रकारे पेट्रोल व डिझेल वरील दरात कपात केली व त्यापाठोपाठ भाजपा शासित राज्यांनेही त्याच बरोबरीने दरात कपात केली त्याच प्रमाणे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दरात कपात करून राज्यातील जनतेला दिलासा द्यावा अशी जनतेची स्वाभाविक इच्छा आहे.
राज्यात पेट्रोल व डिझेल वर अनुक्रमे २४ व २५ टक्के वॅट आकाराला जातो, त्याखेरीज पेट्रोलवर प्रतिलिटर ९ रुपये सेसही आकाराला जातो. यामध्ये दुष्काळासाठी लागू केलेला ३ रुपये प्रतिलिटर सेसचा समावेश आहे. राज्य सरकारला पेट्रोल-डिझेलवरील करापोटी प्रतिलिटर मागे ३५ ते ४० रुपये मिळतात.
तरी राज्यातील मविआ सरकारने, केंद्र सरकार प्रमाणे तत्काळ पेट्रोल-डिझेल वरील वॅट कमी करून अनुक्रमे ५ व १० रुपयांची सवलत द्यावी तसेच पेट्रोल वरील प्रतिलिटर ३ रुपये दुष्काळी शेष ताबडतोड रद्द करावा, ही कपात वॅट कमी केल्यामुळे मिळणाऱ्या सवलतीशिवाय अतिरिक्त असावी अशी भाजपा जळगांवच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मविआ सरकारला मागणी करण्यात आली, अन्यथा भाजपा रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलण छेडेल असा यावेळी इशारा देण्यात आला.
यावेळी प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत चोपडा तालुक्यातील असंख्य शिवसेना कार्यकर्त्यांनी माजी मंत्री आ. गिरीषजी महाजन, खासदार रक्षाताई खडसे व भाजपा जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
यावेळी माजी मंत्री आ. गिरीषजी महाजन व खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष आ.सुरेश (राजुमामा) भोळे, जि.प.अध्यक्षा सौ.रंजनाताई पाटील, जि.प.उपाध्यक्ष श्री.लालचंद पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांतभाऊ महाजन, जि.प.सदस्य श्री.मधुकर काटे, जळगांव शहराध्यक्ष श्री.दिपक सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष श्री.प्रल्हाद पाटील, श्री.पद्माकर महाजन, जिल्हा सरचिटणीस श्री.सचिन पानपाटील, श्री.विशाल त्रिपाठी, श्री.पोपटतात्या भोळे, श्री.कपिलजी पाटील, श्री.राजू सोनवणे, श्री.हिराभाऊ चौधरी, श्री.नवलसिंग राजपूत, श्री.आत्माराम म्हाळके, श्री.गजेंद्र सोनवणे यांच्यासह जिल्हातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.