Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
    क्राईम

    धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

    editor deskBy editor deskJuly 30, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा : प्रतिनिधी

    भरधाव रेल्वेतून पडल्याने परराज्यातील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि.२९ जुलै रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली असुन, प्रथमदर्शनी मयताची ओळख पटविणे अवघड असल्याने अखेर ३० जुलै रोजी मयताची ओळख पटली. मयत इसम हा उत्तर प्रदेश येथील रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा ते गाळण दरम्यान रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३६५ / २१ नजीक एका इसमाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती रेल्वे क्रं. १८०२९ चे लोकोपायलट आर. एस. कोष्टी यांनी वाॅकी टाॅकी द्वारे पाचोरा स्टेशन प्रबंधक यांना दिली. घटनास्थळ हे पाचोरा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील असल्याने स्टेशन प्रबंधक यांनी पाचोरा पोलिस स्टेशनला माहिती कळविली असता, पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस काॅन्स्टेबल निवृत्ती मोरे, पोलिस नाईक सचिन निकम हे रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांना सोबत घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करत रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुर्यकांत नाईक यांनी मृतदेहाची चौकशी केली असता मृत व्यक्ती जवळ पाकीट सापडले. पाकिटात एक लकी ड्रॉ कुपन आढळुन आले. पो. ना. यांनी सुर्यकांत नाईक त्या कुपनच्या आधारे भ्रमणध्वनीवरुन छडा लावत मृत व्यक्तीचे नाव मुराली राजकुमार मौर्य (वय – २८) रा. हेतमपुर पो. हेतमपुर, ता. सकडिया, थाना धानापुर, जि. चंदौली (उत्तर प्रदेश) असे निष्पन्न झाले आहे. मयत मुराली मौर्य हे दि. २६ जुलै रोजी वाराणसी कॅन्ट येथुन मुंबई येथे कामासाठी जात असल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांनी दिली. तपासी अंमलदार सुर्यकांत नाईक यांनी सविस्तर माहिती नोंदवत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कार्यक्रमावरून परतताना अपघात; खा.संजय देशमुखांच्या वाहनाचा अपघात !

    February 27, 2026

    भरदुपारी ३५ वर्षीय महिलेने संपविले आयुष्य !

    February 27, 2026

    महिलेसोबत अश्लिल चाळे करीत विनयभंग ; एका विरोधात गुन्हा दाखल !

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.