मुंबई : वृत्तसंस्था
श्री शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे विदर्भ दौऱ्यावर असताना दोन शहरांमध्ये केलेल्या बेताल वक्तव्याप्रकरणी राष्ट्रवादी व काँग्रेसने राज्यभर आंदोलन केले होते तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधिमंडळात आक्रमक भूमिका घेतली होती यानंतर काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जीवे ठार मारण्याची धमकी मिळाली असल्याने त्यांच्या घराबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भ दौऱ्यावर असलेले श्री शिव प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी दोन शहरात केलेल्या वेगवेगळ्या बेताल वक्तव्याबाबत दोन दिवसापासून राष्ट्रवादी व काँग्रेसने राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठे आंदोलन केले आहे त्यानंतर माजी मुख्यमंत्री यांनी विधिमंडळात याबाबत आक्रमक पवित्रा घेतल्याने त्यांच्या कराड येथील निवासस्थानी धमकीचा मेल आला असून यात माजी मुख्यमंत्री चव्हाण यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे याबाबत त्यांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून या धमकीने राज्याच्या राजकारणात मोठे खळबळ उडाली आहे.