मुंबई : वृत्तसंस्था
आपल्या वादग्रस्त विधानाने नेहमी चर्चेत असलेले शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे हे पुन्हा एकदा चर्चेत आले असतांना राष्ट्रवादीसह कॉंग्रसने जोरदार हल्लाबोल करीत आंदोलने केली होती. त्यानंतर गुन्हा देखील दाखल झाला होता पण राष्ट्रवादी व कॉंग्रेस त्यांना अटक होण्यासाठी तीव्र होत नाना पटोले यांनी देखील प्रश्न विचारला असता त्यावर गृहमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गृहमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘संभाजी भिडे यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याचा मी निषेध करतो. ते देशाचे राष्ट्रपिता आहेत. देशाच्या स्वांतत्र्याच्या इतिहासामध्ये एक महानायक म्हणून पाहिलं जात. अशा महानायकाबाबत बोलताना पुर्णपणे अनुचित वक्तव्य करणं चुकीचं आहे.’, असं फडणवीस म्हणालेत. ‘अशा प्रकारचे वक्तव्य भिडे यांनी किंवा अन्य कोणीही करू नये. कारण करोडो करोडो लोकांचा अशा वक्तव्यामुळे संताप तयार होतो. लोक महात्मा गांधी यांच्याबद्दल असं बोलणं कधीही सहन करून घेणार नाहीत. तर यासंदर्भात जी उचित कारवाई करायची आहे ती राज्य सरकारकडून केली जाईल. महात्मा गांधी असतील किंवा वीर सावरकर असो, कोणाबाबतही अशी वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत’, असंही फडणवीस म्हणाले आहेत. संभाजी भिडे यांचा आणि भाजपचा काहीही संबध नाही. ते वेगळी संघटना चालवतात. त्यांच्या या वक्तव्यांना राजकीय रंग देण्याचं काही कारण नाही. ज्याप्रमाणे काँग्रेसचे नेते या प्रकरणाचा निषेध करत आहेत. त्याप्रमाणेच जेव्हा राहुल गांधी स्वा. सावरकर यांच्याबाबत बोलतात तेव्हा त्याचाही निषेध पक्षातील नेत्यांनी करायला हवा, पण त्यावेळी ते मिंधे होतात, असंही फडणवीस म्हणाले आहेत.