Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नेहरू नगरातील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या
    क्राईम

    नेहरू नगरातील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 11, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । शहरातील नेहरू नगरातील ४० वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रात्री उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    जतीन जयप्रकाश चांगरे (वय-४०) रा. सेंट टेरेसा शाळेसमोर, नेहरू नगर जळगाव असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, जतीन चांगरे हे पत्नी व दोन मुलांसह नेहरू नगरात वास्तव्याला आहे. ते जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वार्ड बॉय .म्हणून नोकरीला आहे. दिवाळी निमित्त त्याची पत्नी व दोन्ही मुले माहरी मनमाड जि.नाशिक येथे गेल्या होत्या. तर वडील जयप्रकाश मनिराम चांगरे हे रेल्वे सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी आहेत. ते शहरातील नवल कॉलनी येथे राहतात. दरम्यान पत्नी व मुले गावाला गेल्यामुळे जतीन हा एकटाच होता. सोमवारी ८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत जिल्हा रूग्णालयात कामावर होते. त्यानंतर ते घरी गेले. बुधवारी रात्री १० वाजता त्यांची पत्नी सुमित्रा ह्या मनमाड येथून घरी आल्या. त्यावेळी घराचा दरवाजा बंद होता. त्यांनी भावाच्या मदतीने घर उघडण्याचा प्रयत्न केला असता दुसऱ्या मजल्यावर जतीन यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. पतीचा मृतदेह पाहून पत्नीने हंबरडा फोउला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जतीनने दोन दिवसांपुर्वी आत्महत्या केली असावी असा अंदाज वैद्यकीय अधिकारी यांनी व्यक्त केला आहे.

    त्यांच्या पश्चात वडील जयप्रकाश चांगरे, हितेंद्र व खूशाल दोन भाऊ, पत्नी सुमित्रा, मुलगा प्रतिक आणि मुलगी कुंकुम असा परिवार आहे. आज सकाळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.