जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून गावठी पिस्तुलचा धाक दाखविण्याचे घटना उघडकीस येत असतांना जळगाव शहरात शनिवारी संध्याकाळी मोठ्या प्रमाणात पुन्हा गोळीबार झाल्याची चर्चा जोर धरीत होती पण हि चर्चा शहर पोलिसात ८ ते ९ वाजेपर्यत चालली अन थांबली.
जळगाव जिल्हा दूध संघामध्ये शनिवारी संध्याकाळी पदाधिकाऱ्याने दूध संघाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यावर पिस्तूल रोखल्याची चर्चा शनिवारी रात्री सुरू झाली. मात्र या विषयी पोलिसांनी नकार दिला. रात्री उशिरापर्यंत याला दुजोरा मिळू शकला नाही. या विषयी शहर पोलिस ठाण्यातदेखील पोलिस अधिकारी, कर्मचारी हजर झाले. सोबतच माध्यम प्रतिनिधीदेखील तेथे पोहचले. पोलिसांनी या अधिकाऱ्याकडे विचारणा केली, मात्र तसा कोणताही प्रकार झाला नसल्याचे सांगितले. या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील हेदेखील आले होते. त्यांच्यासह शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांनीही असा प्रकार झाला नसल्याचे सांगितले.