Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव : अल्पवयीन मुलीला पळवून अत्याचार ; आरोपी अटकेत !
    क्राईम

    धरणगाव : अल्पवयीन मुलीला पळवून अत्याचार ; आरोपी अटकेत !

    editor deskBy editor deskJuly 30, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    एका गावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपी व पीडित मुलीला पोलिसांनी शिर्डी येथून ताब्यात घेतले. संशयिताला जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. ३० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. समाधान दंगल पाटील (२५) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. धरणगाव तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. समाधान पाटील याने दि. ५ जुलै रोजी रात्री ११ वाजता पीडित मुलीला फूस लावून दुचाकीने पळवून नेले. त्यानंतर चोपडा येथून लक्झरीने सुरत येथे गेले. तिथे नातेवाइकांकडे १० ते १२ दिवस राहिल्यानंतर समाधान पाटील याने मुलीला लक्झरीने शिर्डी येथे घेऊन गेला. त्या ठिकाणी एका झोपडीत राहून तिच्यावर अत्याचार केला.

    दि. २५ जुलै रोजी दोघे शिर्डी बसस्थानकात असताना शिर्डी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांना धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी समाधान पाटील याला जिल्हा व सत्र न्यायालयाने दि. ३० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

    क्राईम न्यूज जिल्हा न्यायालय धरणगाव शिर्डी पोलीस
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भडगावात ड्रग्जचा धक्का : कारमधून १० पुडी MD जप्त, महिला सहित दोघे ताब्यात

    March 23, 2026

    पाचशे रुपयांसाठी रक्तरंजित हल्ला; जळगावात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

    March 23, 2026

    भरधाव कंटेनरची भीषण धडक; प्रतिष्ठित शेतकरी जागीच ठार

    March 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.