नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात होवू घातलेल्या आगामी काळातील लोकसभेसाठी भाजपने चांगलीच तयारी केली असून महाराष्ट्रात सुरु असलेली नाराजी दुर करण्यासाठी भाजपने राज्यातील नाराज नेते पंकजा मुंडे व विनोद तावडे यांना संधी दिल्याने त्यांची नाराजी काही प्रमाणात दूर होणार असल्याचे देखील संकेत दिले आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शनिवारी पक्षाच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या टीममध्ये फेरबदल केले. तेलंगणा भाजपचे माजी अध्यक्ष बंदी संजय कुमार यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू तारिक मन्सूर यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे यांची राष्ट्रीय महामंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. पंकजा मुंडे, विजया रहाटकर यांची राष्ट्रीय सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.