Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावातील गोळीबार प्रकरण : आठ जण ताब्यात !
    क्राईम

    जळगावातील गोळीबार प्रकरण : आठ जण ताब्यात !

    editor deskBy editor deskJuly 28, 2023No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव शहरातील नवीन कानळदा रोडवर असलेल्या के.सी.पार्क परिसरात दि.२७ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी परस्पर विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणात पोलीसांनी आठ जणांना ताब्यात घेतले आहे.

    पहिल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शहरातील कानळदा रोडवरील के.सी.पार्क येथे शुभम अशोक माने हा आपला भाऊ मयूर माने आणि परिवारासह वास्तव्याला आहे. खंडणीची मागणी आणि पैशांवरून मयूर माने यांचे काही चेतन उर्फ चिंग्या सुरेश आळंदे याचे साथीदार असलेले तरूणांशी वाद सुरू होता. यापुर्वी तरूणांनी चिंग्याला जेलमधून सोडण्यासाठी पैशांची मागणी करत शिवीगाळ व धमकी दिली होती. त्यामुळे घाबरून शुभमने वेळोवळी फोन-पे ने पैसे दिले होते. अजून पुन्हा पैशांची मागणी करण्यासाठी गुरूवारी २७ जुलै रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास मयूर माने हा आपल्या परिवारासह घरी असतांना सात ते आठ तरूणांनी घरासमोर येवून शिवीगाळ व दगडफेक केली. त्यामुळे माने कुटुंबिय घराचा दरवाजा बंद करून घरात गेले. त्यावेळी घराच्या खाली उभे असलेल्या तरूणांनी घरावर दगडफेक केली. त्यानंतर गोळीबार केला. त्यानंतर पसार झाले.

    दुसऱ्या फिर्यादीत म्हटले आहे की, शहरातील संत मिराबाई नगरात चेतन रमेश सुशीर हा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. चेतनची गेल्या काही वर्षापासून शुभम माने याची ओळख आहे. सात महिन्यांपुर्वी शुभम माने याने चेतन कडे उसनवारीने पैसे मागितले होते. जास्त पैसे मिळतील या उद्देशाने चेतन सुशीर आणि उमाकांत दत्तात्रय धोबी यांनी मिळून ८०हजार रूपये दिले. त्यानंतर चेतन आणि उमाकांत यांनी दिलेल्या पैशांची मागणी केली असता शुभम माने हा पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. त्यामुळे चेतन सुशीर हा त्याचे मित्र लखन मराठे, लक्ष्मण शिंदे, नरेश शिंदे, समीर सोनार, बंटी बांदल यांना सोबत घेवून गुरूवारी २७ जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता शुभच्या घरी आले. त्यावेळी पैसांची मागणी केली असता शुभमने शिवीगाळ केली. त्यानंतर आलेल्या तरूणांवर दोन वेळा गोळीबार केला. त्यानंतर सर्वजण जीव वाचवून पळत सुटले.

    गोळीबार प्रकरणात शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. यात पहिल्या फिर्यादीनुसार लखन ऊर्फ गोलू दिलीप मराठे रा. शिवाजी नगर, लक्ष्मण शिंदे रा. शिवाजी नगर, नरेश शिंदे रा. शिवाजी नगर, उमकांत दत्तात्रय धोबी रा. संत मिराबाई नगर, जळगाव, समीर शरद सोनार रा. फारेस्ट कॉलनी जळगाव, राजेश उर्फ बंटी सदाशिव बांदली रा. उस्मानिया पार्क, जळगाव, चेतन रमेश सुशीर रा. मिराबाई नगर, जळगाव, चेतन सुरेश आळंदे उर्फ चिंग्या रा. तुकाराम वाडी, जळगाव आणि महेश मराठे रा. शिवाजी नगर हुडको, जळगाव यांच्यावर गुन्हे दाखल झाले तर दुसऱ्या फिर्यादीवरून शुभम अशोक माने आणि मयूर अशोक माने दोन्ही रा. कानळदा रोड, जळगाव यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    हे आहे अटकेत !
    चेतन रमेश सुधीर, राजेश बांदल, उमाकांत धोबी, समिर सोनार, लक्ष्मण शिंदे, लखन शिंदे, मयूर माने, शुभम माने या आठ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कार्यक्रमावरून परतताना अपघात; खा.संजय देशमुखांच्या वाहनाचा अपघात !

    February 27, 2026

    भरदुपारी ३५ वर्षीय महिलेने संपविले आयुष्य !

    February 27, 2026

    महिलेसोबत अश्लिल चाळे करीत विनयभंग ; एका विरोधात गुन्हा दाखल !

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.