नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे मोठी दंगल उसळली होती. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आरोपी ऍड.अरुण फरेरा आणि वेरनॉन गोन्साल्विस यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. या दोघांवर माओवाद्यांशी संबंध असल्याबद्दल आरोप आहेत.
#BREAKING#SupremeCourt grants bail to Bhima Koregaon accused Vernon Gonsalves & Arun Ferreira who are facing charges under the Unlawful Activities (Prevention) Act, 2002, for alleged Maoist links.#SupremeCourtofIndia #BhimaKoregaon #UAPA pic.twitter.com/YUpHlJZhgB
— Live Law (@LiveLawIndia) July 28, 2023
न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने ३ मार्च रोजी निकाल राखून ठेवल्यानंतर भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी आरोपी असलेल्या वेरनॉन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांच्या जामीन अर्जावर निकाल दिला. दरम्यान या दोघांना देण्यात आलेला जामीन हा अनेक अटींसह मंजूर करण्यात आला आहे. या दोघांना ट्रायल कोर्टाची परवानगी घेतल्याशिवायमहाराष्ट्र सोडून जाऊ शकत नाहीत आणि त्यांना त्यांचे पासपोर्ट राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या तपास अधिकाऱ्यांकडे जमा करावे लागतील. तसेच हे दोघे ते कुठे राहतात यावर आणि मोबाईल फोन वापरण्यावरही निर्बंध आहेत.