• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शरद पवार मैदानात ; शिंदे, फडणवीस व अजित पवारांना करणात चीतपट !

editor desk by editor desk
July 28, 2023
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
शरद पवार मैदानात ; शिंदे, फडणवीस व अजित पवारांना करणात चीतपट !

मुंबई : वृत्तसंस्था 

शिंदे – फडणवीस सरकारमध्ये अजित पवार स्वतः उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादीत मोठी बंडखोरी झाली होती. आता शरद पवार राज्यात पक्ष बांधणीसाठी मैदानात उतरले असून त्यांनी आता पक्षाचे बंडखोर नेते व भाजपला मैदानात चीतपट करण्यासाठी तयारी सुरु केली असून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी याबबत ३ प्लॅन तयार केले असून, त्याचा सर्वात मोठा फटका केंद्रातील सत्ताधारी भाजपला बसण्याची शक्यता आहे.

यात  छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आदी बडे नेते कॅबिनेट मंत्री झाले. या घटनाक्रमामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाली. त्यानंतर अजित पवारांच्या गटाने शरद पवारांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला. पण पवारांनी त्यांच्यासोबत येण्यास ठाम नकार दिला. आता पवार पुन्हा एकदा नव्या जोमाने पक्ष संघटना बांधणीसाठी मैदानात उतरलेत. त्यांनी यासंबंधी 3 प्लॅन तयार केलेत.

राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाल्यानंतर शरद पवार यांनी पक्षाला उभे करण्यासाठी 3 प्लॅन तयार केलेत. यातील पहिल्या प्लॅननुसार, शरद पवार पक्ष बांधणीवर जोर देणार आहेत. त्यानुसार राज्यातील सर्वच महत्त्वाचे जिल्हे व तालुक्यांत त्यांच्या सभा होतील. या भागातील जनतेशी शरद पवार संवाद साधून त्यांना आपल्या गाठीशी बांधण्याचा प्रयत्न करतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या भागावर त्याचा विशेष लक्ष असेल. नेते गेले तरी कार्यकर्ते व जनता आपल्याबरोर राहील याची खास काळजी शरद पवार घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  शरद पवार आपल्या दुसऱ्या प्लॅन अंतर्गत पर्यायी नेतृत्व निर्माण करण्यावर भर देणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या आमदारांनी पक्षाशी बंडखोरी केली, त्यांच्या मतदार संघात ते पर्यायी नेतृत्व उभे करतील. यात पक्षाच्या माजी आमदारांना पुन्हा ताकद दिली जाईल. त्यांना रसद पुरवली जाईल. हे माजी आमदार निवडणुकीत उतरतील, याच हिशेबाने त्यांना तयार केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले आहे.

शरद पवारांची तिसरी खेळी सत्ताधारी भाजपसाठी नुकसानकारक ठरण्याची शक्यता या आहे. या तिसऱ्या प्लॅननुसार, शरद पवार भाजपच्या अडगळीत पडलेल्या माजी आमदारांना आपल्या गोटात वळवण्याचा प्रयत्न करतील. या आमदारांना राष्ट्रवादीत घेऊन त्यांना रसद पुरवली जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, या आमदारांची राजकारणात पुन्हा सक्रीय होण्याची इच्छा आहे. पण भाजपने त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. यामुळे त्यांचा नाईलाज झाला आहे. त्यामुळे पवारांचा त्यांच्यावर डोळा आहे. यात त्यांना यश आले तर ते भाजपसाठी चांगलेच जड जाईल.

Previous Post

आ.खडसेंनी केली विधानपरिषदेमध्ये मागणी : गैरव्यवहाराप्रकारणी कारवाई करा !

Next Post

उद्योग रत्न पुरस्कारासाठी रतन टाटांचे नाव घोषित !

Next Post
उद्योग रत्न पुरस्कारासाठी रतन टाटांचे नाव घोषित !

उद्योग रत्न पुरस्कारासाठी रतन टाटांचे नाव घोषित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group