जळगाव : प्रतिनिधी
परप्रांतीय तरुण गोव्याला कामानिमित्त गेलेला असतांना त्याची प्रकृती बिघडल्याने, मित्रांसोबत परत घरी जाण्यासाठी निघाला असताना घरी पोहोचण्याआधीच रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे ४ वाजता घडली. कलीम बाबूराव कोमार (वय २८, रा. उडुरमा, ता. कुटुरा, ओडिशा) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जळगाव लोहमार्ग पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मित्रांसोबत पुन्हा ओडिशामधील आपल्या गावाला जाण्यासाठी मंगळवारी निघाला. मात्र, बुधवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास म्हसावद गावाजवळ कलीम याला अस्वस्थ वाटत असल्याने तो बाथरूमला जाण्यासाठी गेला. मात्र, त्याची प्रकृती खाल्यावल्याने त्याला चक्कर येऊन तो धावत्या रेल्वेतून खाली पडला.