Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तत्कालीन जिल्हाधिकारी मित्तल यांचे घरगुती साहित्य विक्रीला !
    क्राईम

    तत्कालीन जिल्हाधिकारी मित्तल यांचे घरगुती साहित्य विक्रीला !

    editor deskBy editor deskJuly 28, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करीत या अकाऊंटवरून घरगुती साहित्य विक्री करावयाचे असल्याची पोस्टदेखील टाकण्यात आली आहे. या प्रकरणी अमन मित्तल यांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची गेल्याच आठवड्यात बदली झाली आहे. सायबर चोरट्यांनी अमन मित्तल यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले आहे. तसेच त्या अकाऊंटवरून घरगुती साहित्य विक्रीला द्यावयाचे सांगत, फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अमन मित्तल आयएएस या नावाने हे अकाऊंट तयार केले आहे. तसेच याच नावाने मित्तल यांचे अधिकृत अकाऊंटदेखील आहे. त्यांच्याच अकाऊंटवरील फोटो वापरून बनावट अकाऊंट तयार करण्यात आले. बनावट अकाऊंटवरून घरगुती साहित्य विक्री करण्यात येणार असल्याची पोस्ट टाकल्यानंतर ही पोस्ट व्हायरल झाली. त्यानंतर मित्रांनी याबाबत मित्तल यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी ऑनलाईन पध्दतीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तसेच प्रकाराबाबत फोनवरून जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांना कळविले. संबंधित बनावट फेसबुक खातं व त्यावरून फसवणूक संदर्भातील मॅसेजचे फोटो अमन मित्तल यांनी पोलीस अधिक्षकांना व्हॉट्सअॅपवरून पाठविले. मित्तल यांनी आपल्या अधिकृत अकाऊंटवरूनदेखील आपले बनावट अकाऊंट तयार करण्यात आल्याचे सांगितले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कार्यक्रमावरून परतताना अपघात; खा.संजय देशमुखांच्या वाहनाचा अपघात !

    February 27, 2026

    भरदुपारी ३५ वर्षीय महिलेने संपविले आयुष्य !

    February 27, 2026

    महिलेसोबत अश्लिल चाळे करीत विनयभंग ; एका विरोधात गुन्हा दाखल !

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.