लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरात जवाहर रोड गुजराथी गल्ली, धरणगांव तालुक्यात खामखेडा, सार्वे, बाभळे, येथील परवानाधारकांनी राजीनामा दिल्याने तसेच विवरे, भोकणी, मुसळी बु, शेरी, कल्याणे बु. या पाच महसुली गांवात दुकान नसल्याने व बोरगांव बु. येथील रद्द केल्याने व गारखेडा येथे विनापरवानगीदिर्घ मुदतीपासुन रजेवर असल्याने या ११ ठिकाणी नव्याने स्वस्त धान्य दुकानांचे जाहिरनामे दि. १२ ऑक्टोबर, २०२१ रोजी जाहिर करण्यात आलेले आहेत. त्यासाठी अर्ज धरणगांव पुरवठा विभागात उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि.२० नोव्हेंबर- २०२१ पर्यंत आहे, अशी माहिती धरणगांव तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी दिली.
यासाठी गावातील ग्रामपंचायत, बचत गट, सहकारी संस्था, आदिना अर्ज करता येणार आहे. अशी माहिती ही तहसिल प्रशासनामार्फत देण्यात येत आहे. यासाठी स्वयंसहाय्यता बचत गट नोदंणीकृत असले बाबत दस्तऐवज, रास्त भाव दुकान चालविणे साठी असलेल्या भांडवलाबाबतचे प्रमाणपत्र, रास्त भाव दुकान परवाना संमती पत्र, संस्थेचा ठराव, ताळेबंद, बँक बॅलन्स, पोटनियमाची प्रत, त्याच गावातील क्षेत्रातील संस्था असल्याबाबतचा पुरावा, स्वयंसहाय्यता बचत गटाचे सदस्य यांचे त्यांच्या कुटुंबात कोणासही रास्त भाव दुकान मंजुर झाले नसल्या बाबतचे प्रतिज्ञापत्र संस्था, स्वयंसहाय्यता गटाबाबत न्याय प्रविष्ठ बाब नसल्याबाबत दस्तऐवज, संस्था, नोंदणीकृत व कार्यरत असले बाबत संस्था निंबधकाचे प्रमाणपत्र, तसेच संस्थेच्या उपविधी मध्ये स्वस्त धान्य दुकान चालविणे बाबत तरतुद असणे आवश्यक राहील. नसल्यास तशी तरतुद नमुद करुन संस्थेची उपविधी सादर करावी, असे आवाहन तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी केले.