भडगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील कजगाव- कनाशी रस्त्यावर पायी जात असताना लोन पिराचे गावाजवळ दुचाकीवरून आलेल्या तिघांनी एकाला जबर मारहाण करीत त्याला लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला तीन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील कनाशी येथील रहिवासी सागर राजेंद्र भदाणे (वय २६) हे दि. २४ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास कजगाव येथून कनाशी गावाकडे रस्त्याने पायी जात असताना लोन पिराचे गावाजवळ अज्ञात तीन व्यक्तींनी दुचाकीवरून येऊन त्यांना मारहाण करून शिवीगाळ करीत त्यांच्या जवळील मोबाईल आणि बाराशे रुपये रोख लुटून नेले .याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सपोनी चंद्रसेन पालकर करीत आहे.