मुंबई : वृत्तसंस्था
उष्माघाताने होणाऱ्या मृत्युंना नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरून मृतांचे कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी एकनाथराव खडसे यांनी तारांकित प्रश्ना द्वारे विधानपरिषद सभागृहात केली यावेळी आ.एकनाथराव खडसे म्हणाले राज्यात उष्णतेच्या प्रमाणात वाढ झालेली आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात ११ नागरिकांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे शासनाने जाहीर केले आहे तसेच जळगाव जिल्ह्यात सुद्धा उष्माघातामुळे बऱ्याच नागरिकांचा मृत्यू झालेला आहे हे खरे आहे काय, असल्यास, उष्माघाताने होणाऱ्या मृत्युंना नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरून मृतांचे कुटुंबियांना शासनाकडून किमान ५ लाख रुपये आर्थिक मदत मिळणेबाबत मा.लोकप्रतिनिधी यांनी मा.मुख्यमंत्री महोदय यांचेकडे दिनांक १४ मे २०२३ रोजी पत्रव्यवहार करून मागणी केलेली आहे असे असल्यास, उष्माघाताने होणाऱ्या मृत्युंना नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरून मृतांचे कुटुंबियांना शासनाकडून किमान ५ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी एकनाथराव खडसे यांनी केली. याला आपत्ती व्यवस्थापन मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी उत्तर दिले खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात १४ नागरिकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे जळगाव येथे २ उष्माघात संशयीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिनांक १४ मे २०२३ चे निवेदन विभागास प्राप्त झाले नाही राज्यात उष्माघात ही नैसर्गिक आपत्ती म्हणून अधिसूचित केली नसून ती अधिसूचित करण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. तथापि, खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने मृत्यू पावलेल्या १४ नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लक्ष देण्यात आले आहेत असे मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले