• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अजित पवारांची खेळी : शरद पवारांचे कार्यकर्ते अजित पवारांच्या गोटात !

editor desk by editor desk
July 26, 2023
in राजकारण, राज्य
0
अजित पवारांची खेळी : शरद पवारांचे कार्यकर्ते अजित पवारांच्या गोटात !

मुंबई : वृत्तसंस्था 

राज्याच्या राजकारणात सुरु असलेले राजकीय गणिते पाहता शरद पवारांची राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेते आता अजित पवारांच्या गटात सामील होण्यासाठी मोठी रस्सीखेच सुरु असून त्याचा पहिला अनुभव सोलापूर जिल्ह्यात आलेला आहे. शरद पवारांचे कट्टर समर्थक मानले जाणारे नेते आता अजित पवारांच्या गटात आल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.

शरद पवार गटाचे खंदे समर्थक आणि सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांचे घरदेखील फुटल्याचे मानले जात आहे. बळिराम साठे यांचे सुपुत्र जितेंद्र साठे आणि नातू जयदीप साठे हे अजित पवार यांच्या गटात सामील झाले आहेत. या संबंधितांनी मंगळवारी मुंबईत अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सुनील तटकरे उपस्थित होते. मोहोळचे आमदार आणि अजित पवार यांचे कट्टर समर्थक यशवंत माने यांनी याप्रकरणी मध्यस्थी केली आहे. विशेषत्वे, या घटनेने बळिराम साठे यांना धक्का बसल्याच्या चर्चेचे मोहोळ उत्तर सोलापूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात उठले आहे. शिवाय सुरवातीला सुपुत्र आणि नातू यांना अजित पवार गटाकडे पाठवायचे त्यानंतर आपण स्वत:हून याच गटात सामील व्हायचे अशी खेळी खुद्द बळिराम साठे यांचीच असल्याच्या चर्चेचे वादळदेखील आता उठले आहे. बळिराम साठे यांनीच सुपुत्र आणि नातू यांना अजित पवारांकडे पाठविल्याचा सर्वत्र बोलबाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे कट्टर समर्थक व सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांचे चिरंजीव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे व नातू जयदीप साठे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. त्यातून नव्या चर्चांना आता तोंड फुटले आहे. बळिराम साठे हे यापूर्वी माजी आमदार राजन पाटील यांच्या समवेत भाजपत जाण्याच्या बेतात होते. मात्र, पुढे राजन पाटील यांचाच प्रवेश लांबल्याने बळिराम साठे हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहिले. अजित पवार यांचा गट फुटल्यानंतर शरद पवार यांच्या गटासमवेत राहण्यातच बळिराम साठे यांनी धन्यता मानली होती.

Previous Post

मार्केटमध्ये जवानाने केला महिलेचा विनयभंग : व्हिडीओ होतोय व्हायरल !

Next Post

विद्यार्थी लघुशंकेसाठी गेला अन तिघांनी मोबाईल लांबविला ; वाचा कुठे घडली घटना !

Next Post
धरणगाव तालुक्यात तिघांनी धक्काबुकी करीत तरुणाकडील मोबाईल पळविला

विद्यार्थी लघुशंकेसाठी गेला अन तिघांनी मोबाईल लांबविला ; वाचा कुठे घडली घटना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group