लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा बँकेमध्ये माघारीनंतर अनेक घडामोडी घडत आहे जिल्हा बँकेत भाजपने माघार घेतली आहे.तर नाराज पदाधिकाऱ्यांनी आपले पॅनल बनविले असून त्यांनी बलाढय नेत्यांना आव्हान दिले आहे तर रावेर मध्ये मात्र वेगळेच पॅटर्न पाहायला मिळत आहे राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना भाजपने पुरस्कृत केल्यानंतर चक्क कॉंग्रेसच्या उमेदवाराने जाहीर पाठींबा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.या जागेसाठी कॉग्रेस चे आमदारशिरीष चौधरी यांनी खूप प्रयत्न केले होते ती त्यांना मिळाली सुद्धा होती मात्र कॉग्रेस च्या उमेदवाराने दुसऱ्या च उमेदवाराला पाठींबा जाहीर केला.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माघारी नंतर अनेक घडामोडी होत आहे. रावेर विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघात अतिशय नाट्यमय घडामोडी झाल्या. राष्ट्रवादीचे माजी आमदार अरूण पांडुरंग पाटील यांना महाविकास आघाडीने उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी थेट भाजपचा पाठींबा घेतला. यानंतर काल माघारी नंतर माजी आमदार अरुण पाटील, जनाबाई गोंडू महाजन राजीव पाटील हे तिन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. अर्थात रावेरात तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र आज स्पष्ट झाले होते. मात्र आज यात पुन्हा राजकिय घडामोडी होत पुन्हा चित्र बदले.
आज दुपारी महाविकास आघाडीतील कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवार जनाबाई गोंडू महाजन यांनी अरुण पांडुरंग पाटील यांना जाहीर पाठिंबा दिल्याने रावेरात खळबळ उडाली आहे. जनाबाई महाजन यांनी पाठिंब्याचे पत्र अरुण पाटील यांच्याकडे त्यांचे पती गोंडू महाजन यांच्यावतीने दिले. यामुळे राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना भाजपने पुरस्कृत केले असून त्यांना कॉंग्रेसच्या उमेदवाराने पाठींबा दिल्याचे चमत्कारीक चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.
दरम्यान, याहून आश्चर्याची बाब म्हणजे भाजपने पुरस्कृत करून देखील स्थानिक पातळीवरील राष्ट्रवादीचे समस्त पदाधिकारी हे अरूण पांडुरंग पाटील यांच्या पाठीशी उभे असल्याचे चित्र आज दिसून आले आहे. यात राष्ट्रवादीचे किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, बाजार समितीचे संचालक डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. सुभाष पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, नितीन पाटील , मंदार पाटील, सिताराम पाटील आदींसह इतरांचा समावेश आहे. यामुळे तालुक्यातून आता अरूण पांडुरंग पाटील यांच्या विरूध्द राजीव पाटील अशी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.