मुंबई : वृत्तसंस्था
मुंबईत हिंदुजा रुग्णालयात त्यांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचं वयाच्या ८० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. विनोदी लेखन आणि क्रीडा पत्रकारीतेसाठी ते प्रसिद्ध होते. प्रकृती बिघडल्याने शिरीष कणेकर यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारावेळी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले.
शिरीष कणेकर यांची ओळख शैलीदार लेखक, फिल्मी गप्पांची मैफल रंगवणारे वक्ते अशी होती. वृत्तपत्रांमध्ये सिनेमा, क्रिकेट, राजकारण यावर त्यांचे स्तंभलेखन प्रसिद्ध आहे. तसंच कणेकरी, फिल्लमबाजी, शिरीषासन यातून त्यांनी विनोदी लेखनही केलं.मुंबई विद्यापीठातून शिरीष कणेकर यांनी एलएलबी पूर्ण केली. त्यानंतर पत्रकार म्हणून त्यांनी इंडियन एक्सप्रेस, फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रांमधून काम केलं. तसंच लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्, सामना यासह मराठीतील वृत्तपत्रांमधून त्यांचे स्तंभलेखन प्रसिद्ध होत होते. साप्ताहिक, मासिकांमधून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट विनोदी वाङ्मयाचा पुरस्कारही मिळाला होता. लगाव बत्ती या कथासंग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता.