प्रतिनिधी प्रविण पाटील: आमदार संजय शिरसाठ यांनी ग्रामसेवकांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा जाहीर निषेध करीत जळगाव तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष बबन राजु वाघ यांनी बीडीओ, तहसीलदार, पोलीस निरीक्षक याना निवेदन देण्यात आले.
औरंगाबाद पश्चिम विधानसभेचे आमदार संजय शिरसाठ यांनी ०८ रोजी औरंगाबाद येथे सरपंचांचे प्रशिक्षण कार्यशाळेत भाषण करतांना, शासकिय व्यासपीठावरुन ग्रामसेवक संवर्गाबद्दल “भामटा, हरामखोर ” अशी अपशब्द वापरुन संवर्गाची बदनामी केली तसेच, ग्रामविकासात सरपंच व ग्रामसेवक यांची संयुक्तीक जबाबदारीचे भान न ठेवता दोघांमध्ये कसा तेढ निर्माण होईल ? अशा दृष्टीने, ग्रामसेवक तुमचा नौकर आहे, तो तुमच्या हाताखाली काम करतो, त्याचे ऐकु नका, असे वेजबाबदार विधान करुन दोन ग्रुपमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले व चिथावणी खोर भाषण करुन संपुर्ण महाराष्ट्रात चुकीचा संदेश देवुन ग्रामसेवक संवर्गाविषयी अविश्वासाचे वातावरण तयार केले. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात ग्रामसेवक संवर्ग प्रचंड तणावात येवुन, संवर्गात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
दि 9 रोजी जळगाव येथे जळगाव तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष बबन राजु वाघ यांनी औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाठ यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधाना याबद्दल जळगाव तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने निवेदन जळगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी व जळगाव तहसीलदार, जळगाव पोलिस स्टेशनचे निरिक्षक यांना निवेदन देण्यात आले व एक दिवसीय बंद पाळण्यात आला निवेदन देतांना जळगाव ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष बबन वाघ व तालुक्यातील सर्व ग्रामसेवक उपस्थित होते.