Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बुलढाण्याच्या घाटात बस उलटली !
    क्राईम

    बुलढाण्याच्या घाटात बस उलटली !

    editor deskBy editor deskJuly 25, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राज्यातील महामार्गावर गेल्या अनेक दिवसापासून अपघाताची मालिका सुरु असतांना राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. मलकापूर- बुलढाणा बसचा भीषण अपघात झाला आहे. बसचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. ही बस थेट राजूर घाटात पलटी झाली. बसमध्ये 55 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रवाशांमध्ये काही विद्यार्थ्यांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, या बसमध्ये २० विद्यार्थी असल्याची माहिती देखील मिळत आहे. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले आहे. ही बस मलकापूरहून बुलढाण्याकडे निघाली होती. एसटी बस क्रमांक ८३७५ या बसचा जॉईंचर निसटला होता. बस मागे जात होती. यावेळी ब्रेक लागले नाहीत. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि अपघात झाला, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघाताची माहिती कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठविले. सर्व जखमींवर बुलढाणा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.