मुंबई: वृत्तसंस्था
पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी राज्य सरकारच्या बोगस कारभाराचे पिसे काढत भोंगळ कारभारावर चांगलेच ताशेरे ओढून मध्यान्ह भोजन योजनेत किती भ्रष्टाचार होत आहे हे सभागृहापुढे मांडले. तसेच या सर्वांची चौकशी करून त्याचा अहवाल सभागृहापुढे सरकार ठेवणार का? असे प्रश्न खडसेंनी सभागृहापुढे उपस्थित केला आहे.
पावसाळी अधिवेशनात सोमवारी एकनाथ खडसे बोलतांना म्हणाले की, राज्याची १४ कोटी लोकसंख्या असून या जनतेपैकी सव्वा चार कोटी लोक हे मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ घेत आहे ही शासनाची आकडेवारीवरून आहे. यावरून महाराष्ट्राची दरिद्री किती आहे हे आपल्या कळते, असा खोचक टोला लागवला. तसेच दिल्लीतील नवीन संसद भवन ते सेंट्रल व्हिस्टा बांधायला ३ वर्षे इतका काळ लागला तर, २३ हजार बांधकाम मजुरांनी ते बांधकाम पूर्ण केले. जळगाव जिल्ह्यात एका वर्षामध्ये एका दिवसाला ७० हजार बांधकाम मजूर भर उन्हामध्ये काम करत होते. सेंट्रल व्हिस्टाला ६ महिन्यात इतके लागले. कलेक्टरच्या रेकॉर्डनुसार जिल्ह्यात एक ब्रासदेखील वाळू या वर्षभरामध्ये दिली गेली नाही, यामुळे बांधकाम बंद आहेत. जर वाळूच दिली नाही तर हे ७० हजार बांधकाम मजूर आले कुठून? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.