Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दिल्लीत राज्यातील माजी आमदार जाधवांना हृदयविकाराचा झटका
    क्राईम

    दिल्लीत राज्यातील माजी आमदार जाधवांना हृदयविकाराचा झटका

    editor deskBy editor deskJuly 24, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडचे माजी आमदार तर बीआरएस पक्षाचे नेते हर्षवर्धन जाधव यांना दिल्लीत हृदयविकाराचा झटका आला असून ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटण्यासाठी नवी दिल्ली स्थित त्यांच्या निवासस्थानी गेले होते. तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने नवी दिल्ली येथील आर एम एल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील सरकारी निवासस्थानी हर्षवर्धन जाधव काही कामानिमित्त गेले होते. तिथेच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना तात्काळ RML रुग्णालयात हलवले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून स्वतःच्या प्रकृतीची माहिती दिली. त्यात ते म्हणाले की, मला बहुतेक हृदयविकाराचा झटका आला आहे. नितीन गडकरी यांच्या घरी असताना मला हृदयविकाराचा झटका आला. आता मला रुग्णालयात घेऊन जात आहेत. माझी आधी अँजियोप्लास्टी झालेली आहे. भारत माता की जय, देशाची काळजी घ्या, महाराष्ट्राची काळजी घ्या. कन्नड मतदारसंघाची काळजी घ्या. वाचलो तर पुन्हा भेटू, असे ते या व्हिडिओत म्हणताना दिसून येत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.