माघारी अर्जानंतर लढतीचे चित्र स्पष्ट ५ गटातील ४२उमेदवारांच्या सहकार व शेतकरी पॅनलमध्ये होणार लढती
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा बँकेच्या २१ संचालकांच्या निवडणूकीसाठी ८ नोव्हेंबर रोजी १०८ उमेदवारांच्या माघारीनंतर ५ गटातील ४२ उमेदवारांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. निवडणूक लढवित असलेल्या ४२ उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकार्यांकडून मंगळवार दुपारी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. यात निवडणूक रिंगणात असलेल्या दोन ते तीन उमेदवार वगळता अन्य उमेदवारांनी सहकार व शेतकरी पॅनल गठीत केले असून बुधवारपासून निवडणूक प्रचाराला सुरूवात केली जाणार आहे. तर निवडून आलेल्या उमेदवारांमधून अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी आडाखे बांधणे सुरू असून यात चुरस रंगणार असल्याचे चित्र आहे.
२०२१-२०२६ साठी जिल्हा बँकेच्या २१ संचालकांची निवडणूकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २१ रोजी मतमोजणी घेण्यात येणार आहे. एरवी जिल्हा बँकेची सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून होणारी निवडणूक बिनविरोध झालेली आहे. परंतु यावेळी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यत विविध चर्चां आडाखे साफ चुकवत बिनविरोध होणारी निवडणूक १०८ उमेदवारांच्या माघारीनंतर ४२ जणांच्या शेतकरी व सहकार पॅनलच्या माध्यमातून चांगलीच रंगणार आहे.
हे आहेत बिनविरोध संचालक
जिल्हा बँकेच्या २१ संचालकांपैकी मुक्ताईनगर मधून माजी मंत्री एकनाथराव खडसे, अमळनेरमधून आ. अनिल पाटील, चाळीसगाव मधून प्रदिप देशमुख, धरणगाव मधून संजय पवार, एरंडोल मधून अमोल चिमणराव पाटील, पारोळा मधून आ.चिमणराव पाटील, जळगाव मधून महापौर जयश्री महाजन, जामनेर मधून नाना पाटील, पाचोरा मधून आ. किशोर पाटील, बोदवड मधून ऍड. रविंद्र पाटील, भडगाव मधून प्रताप हरी पाटील असे ११ संचालक बिनविरोध निवडले गेले आहेत.
निवडणूक लढविणार्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप
भुसावळ विकासोमध्ये शांताराम धनगर, आ. संजय सावकारे, यावल मध्ये प्रशांत चौधरी, गणेश नेहते, विनोद पाटील,रावेर-जनाबाई महाजन, अरूण पाटील, राजीव पाटील, चोपडा- घनःश्याम अग्रवाल, संगीताबाई पाटील, सुरेश शामराव पाटील, इतर संस्था व व्यक्ती मतदार यात जळगावमधून गुलाबराव देवकर, प्रकाश पाटील, रविंद्र सूर्यभान पाटील, उमाकांत पाटील, प्रकाश सरदार, महिला राखीव मधून ऍड.रोहीणी खडसे-खेवलकर, शैलजादेवी निकम, अरूणा दिलीपराव पाटील, कल्पना शांताराम पाटील, शोभा पाटील, सुलोचना पाटील, इतर मागास प्रवर्ग मधून प्रकाश पाटील, राजीव पाटील, डॉ.सतीश पाटील, विकास पवार, अनु.जाती-जमातीतून नामदेव बावीस्कर, प्रकाश सरदार, शामकांत सोनवणे,वि.जा.,भ.ज.,विमाप्र राखीव मधून मेहताबसिंग नाईक, विकास वाघ असे उमेदवारांमध्ये लढत आहे. या उमेदवारांना कपबशी, नारळ, मोटारगाडीसह अन्य निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.
निवडणूक चिन्ह वाटपानंतर दोन उमेदवार वगळता शेतकरी व सहकार पॅनल गठीत झाले आहे. यातील शेतकरी गटात ९ जणांच्या पॅनलमध्ये जनाबाई गोटू महाजन, विनोद पाटील, घनःश्याम अग्रवाल, गुलाबराव देवकर, ऍड.रोहीणी खडसे-खेवलकर, शैलजादेवी निकम, शामकांत सोनवणे, मेहताबसिंग नाईक व डॉ.सतीष पाटील यांचा समावेश आहे. तर सहकार पॅनलमध्ये अरूणा पाटील, विकास पवार, विकास वाघ, कल्पना पाटील, रविंद्र पाटील, राजीव पाटील, सुरेश शामराव पाटील या ७ जणांचा समावेश असून कॉंग्रेसच्या उमेदवारांमध्ये यावलचे विनोद पाटील, चोपड्याचे सुरेश शामराव पाटील, जळगावच्या शैलजादेवी निकम यांच्यासह अन्य उमेदवार आहेत.
अध्यक्ष व उपाध्यक्षांसाठी अशी असेल चुरस
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूक निकालानंतरच जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी चुरस रंगणार आहे. बिनबिरोध निवड झालेल्या सदस्यांमध्ये आ. चिमणराव पाटील यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष तर आ. किशोर पाटील यांनी उपाध्यक्ष म्हणून यापूर्वी कामकाज केले आहे. तर महिला राखीव सह अन्य मतदार संघातून निवडणूक लढविणार्या उमेदवारांमध्ये माजी आ. डॉ. सतीश पाटील, ऍड. रोहिणी खेवलकर यांनी देखिल अध्यक्षपद भूषवले असून माजी आ. गुलाबराव पाटील, संजय सावकारे यांचेसह अन्य संचालक म्हणून कामकाज पाहिले आहे. या बिनविरोध ११ व १० सदस्यांमधून निवडून गेलेल्या उमेदवारांमधून अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी अनेकजण इच्छुक असून माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी आ. सतीष पाटील, आ.किशोर पाटील, माजी आ. गुलाबराव देवकर, ऍड. रविंद्र पाटील या महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादीच्याच पदाधिकार्यांमध्ये चुरस रंगणार असल्याचे चित्र आहे.